शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूरचे सभापती पद खुले

By admin | Published: January 31, 2017 12:06 AM

पंचायत समिती आरक्षण : जत, पलूस, कडेगाव महिलांसाठी

सांगली : जिल्ह्यातील दहा पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण प्रशासनाने सोमवारी जाहीर केले. यात कवठेमहांकाळ, आटपाडी आणि खानापूर पंचायत समित्यांचे सभापती पद खुले, तर जत, पलूस, कडेगाव खुल्या गटातील महिलांसाठी जाहीर झाले आहे. सभापती पद आरक्षण सोडत जाहीर झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभापती आरक्षण सोडत झाली. यात कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर येथील सभापती पद खुले झाले. जत, पलूस आणि कडेगावचे खुल्या गटातील महिलांसाठी, शिराळा अनुसूचित जाती महिला, तासगाव, वाळवा नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर मिरजेचे सभापती पद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. सोडतीच्या सुरुवातीला अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण मिरजेसाठी घोषित करण्यात आले. त्यावर अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी हरकत घेतली. २००२ च्या परिपत्रकानुसार चक्रानुक्रमानुसार आरक्षण काढण्यात यावे व लोकसंख्या गृहित धरण्यात यावी, अशी तरतूद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, २००२ ची तरतूद रद्द करण्यात आल्याचे व १९९७ पासूनचे आरक्षण बघून सोडत काढण्यात यावी, असे आदेश असल्याचे मुळीक यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे लगतच्या निवडणुकीतील आरक्षण लक्षात घेत अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण शिराळ्यासाठी जाहीर करण्यात आले. वाळवा, तासगाव आणि मिरज सभापतिपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या आरक्षणाची प्रक्रिया राबविण्यात आली. यातील एक सभापती पद महिलेसाठी राखीव होते. तासगावचे सभापती पद २०११ व २०१४ ला महिलेसाठी राखीव असल्याने आता ते नागरिकांच्या मागास प्रवर्गातील पुरुष व महिलांसाठी आरक्षित झाले, तर वाळव्याचेही आरक्षण याच गटासाठी जाहीर झाले. मिरज पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आले. सभापती पद खुले झाल्याचे घोषित करताना प्रशासनाने बराचवेळ चर्चा केली. जेथे यापूर्वी महिला आरक्षण होते, ते पद खुले करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, तहसीलदार योगेश खरमाटे, सोनिया घुगे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पंचायत समितीआरक्षण खानापूरसर्वसाधारणआटपाडीसर्वसाधारणकवठेमहांकाळसर्वसाधारणजतसर्वसाधारण महिलापलूससर्वसाधारण महिलाकडेगावसर्वसाधारणमहिलावाळवानागरिकांचामागास प्रवर्गतासगावनागरिकांचामागास प्रवर्गमिरजनागरिकांचामागास प्रवर्गमहिलाशिराळाअनुसूचितजाती महिला