आष्टा : आष्टा नगर परिषदेने ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२०-२१’ अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये केबीपी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवले आहे.
नगर परिषदेने आयोजित केलेल्या टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे स्पर्धेत आठवी ते दहावी गटात चैतन्य सचिन सबनीस याने प्रथम क्रमांक पटकावला तर संस्कृती सचिन सांभारे व मयुरेश हेमंत माळी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. खुल्या गटात अमृता संजीवकुमार महाजन यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. चित्रकला स्पर्धेत पाचवी ते आठवी गटात रिया अनिल शेजाळे हिने प्रथम क्रमांक तर नववी-दहावी गटात परम अनिल शेजाळे याने प्रथम क्रमांक मिळवला. निबंध लेखन स्पर्धेत पाचवी ते आठवी गटात राजनंदिनी राजेंद्र काटकर हिने द्वितीय क्रमांक तर रांगोळी स्पर्धेत खुल्या गटात अमृता संजीवकुमार महाजन यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोहर कबाडे, डॉ. दीपक लिगाडे, मुख्याध्यापिका अरुणा उपाध्ये, डॉ. सतीश बापट यांचे मार्गदर्शन लाभले.