शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

केरळच्या महाप्रलयाचा जिल्ह्यातील डाळिंब उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 1:08 AM

गजानन पाटील ।संख : केरळ राज्यातील अतिवृष्टी, तामिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री करुणानिधींचे निधन या घटनांबरोबरच व्यापाºयांची नफेखोर वृत्ती, बाजारातील आवक यामुळे डाळिंबा च्या दरात गेल्या तीन महिन्यांपासून घसरण सुरु आहे. गेल्या दोन वर्षातील नीचांकी दर सध्या मिळत आहे. सध्या केशरला ३५ ते ३७ रुपये व गणेशला २० ते २३ रुपये ...

ठळक मुद्देस्थानिक व्यापाºयांचा दावा; तीन महिन्यांपासून घसरण सुरूव्यापाऱ्यांनी फिरविली पाठ : दर गडगडल्याने शेतकरी चिंताग्रस्त;

गजानन पाटील ।संख : केरळ राज्यातील अतिवृष्टी, तामिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री करुणानिधींचे निधन या घटनांबरोबरच व्यापाºयांची नफेखोर वृत्ती, बाजारातील आवक यामुळे डाळिंबाच्या दरात गेल्या तीन महिन्यांपासून घसरण सुरु आहे. गेल्या दोन वर्षातील नीचांकी दर सध्या मिळत आहे. सध्या केशरला ३५ ते ३७ रुपये व गणेशला २० ते २३ रुपये दर आहे. व्यापाºयांनी पाठ फिरवली आहे. बाजारात उठावच नसल्याने डाळिंबाचे दर गडगडले आहेत. दर कमी झाल्याने खर्च केलेला पैसासुद्धा निघणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

जत तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र १३ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. अनुकूल हवामान, कमी पाणी यामुळे डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. दरीबडची, उमदी, काशिलिंगवाडी, शेगाव, जाडरबोबलाद, आसंगी, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर, मुचंडी, बेवणूर, उटगी या परिसरातील शेतकºयांनी चांगल्या दर्जाच्या डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. गेल्यावर्षी आॅक्टोबर महिन्यात परतीच्या मान्सून पावसाने दमदार हजेरी लावल्याने तलाव, विहिरी पूर्ण क्षमतेने भरलेल्या होत्या. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीसाठा बºयापैकी असल्याने शेतकºयांनी मार्च-एप्रिल महिन्यात डाळिंबाचा भर (हंगाम) धरला होता.

पुरेसे पाणी, अनुकूल हवामानामुळे फळधारणा चांगली झाली होती. शेतकºयांनी बागा चांगल्या आणल्या होत्या. यावर्षी दर चांगला मिळेल, अशी आशा शेतकरी बाळगून होता.मे महिन्यापर्यंत डाळिंबाला चांगला दर होता. बाजारात आवक कमी होती. त्यामुळे केशरला ६५ ते ७५ रुपये व गणेशला ४० ते ५० रुपये दर मिळत होता. जून महिन्यापर्यंत बाजारात मार्च-एप्रिल महिन्यात फळधारणा झालेल्या फळांची आवक वाढली. मान्सूनचे आगमन झाले.

डाळिंबाची चेन्नई, बेंगलोर, कोलकात्ता या ठिकाणी मोठी उलाढाल होते. पावसाळा सुरु झाल्यानंतर हळूहळू दरात घसरण सुरू झाली. केरळ राज्यात अतिवृष्टी झाली. पूरपरिस्थिती निर्माण झाली. पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढला. त्याचा परिणाम डाळिंबाच्या दरावर झाला.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधींची खालावलेली प्रकृती व नंतर झालेल्या निधनामुळे चेन्नई येथील बाजारपेठ १५ दिवस बंद होती. व्यापारी व एजंटांनी पाठविलेल्या वाहनांतील माल उतरलाच नाही. अन्य बेंगलोर, विजयवाडा (आंध्र प्रदेश) या ठिकाणी तो पाठविण्यात आला होता. तेथे आवक वाढल्याने दर कमी मिळाला होता. त्यानंतर गेल्या दोन महिन्यातही बाजारात आवक वाढल्याने दर कमी झाला आहे. सध्या केशरला ३५ ते ३७ रुपये व गणेशला २० ते २३ रुपये दर मिळत आहे.

बाजारातील आवक, परिस्थितीचा अचूक फायदा घेत व्यापाºयांनी दर पाडला आहे. शेतकºयांना अनेक कारणे सांगून ते कमी दराने माल खरेदी करीत आहेत. शेतकºयांना नाईलाजाने व्यापाºयांना भेटून, बोलावून बागा द्याव्या लागत आहेत. कमी दरात व उधारीवर व्यवहार सुरू आहेत. सध्या बाजारात मालाला उठावच नाही.

व्यापारी शोधण्याची वेळदर कमी झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी अगोदर झालेले व्यवहारही रद्द केले आहेत. अनेक व्यापाºयांनी तालुक्यातून काढता पाय घेतला आहे. डाळिंब खरेदी थांबली आहे. लखनौ, दिल्ली, कोलकाता कर्नाटकातून व्यापारी येतात, पण तेही आले नाहीत. त्यामुळे शेतकºयांवर व्यापारी शोधण्याची वेळ आली असून शेतकरी आर्थिक अरिष्टामध्ये सापडला आहे.जत तालुक्यातील डाळिंबाचे दर कमी झालेले आहेत. महागडी औषधे, रासायनिक खते व मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात केला आहे. कमी दरामुळे हा खर्चसुद्धा निघणे मुश्किल आहे. सरकारने यात लक्ष घालून बागायतदारांना दिलासा द्यावा.- आप्पासाहेब चिकाटी, डाळिंब उत्पादक, दरीबडची

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी