मिरज : एकूण मला मंत्रिपदापासून वंचित ठेवण्याएवढे मुख्यमंत्री हलक्या कानाचे नाहीत. माझ्या पक्षाने मला खूप काही दिले असल्याने, मंत्रिपदासाठी मी नाराज नसल्याचे आ. सुरेश खाडे यांनी सांगितले. गोपीचंद पडळकर किंवा अन्य कोणीही पक्षातून बाहेर पडले तरी, पक्षाला कोणताही फरक पडणार नसल्याचेही आ. खाडे यांनी स्पष्ट केले.गोपीचंद पडळकर यांनी खा. संजय पाटील यांना उद्देशून, आ. सुरेश खाडे व आ. शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवल्याचा आरोप केला आहे.याबाबत आ. खाडे म्हणाले, दोघांच्या भांडणात पडळकर यांनी आरोप केला आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पडताळणी करून खा. संजय पाटील यांना क्लीन चिट द्यावी, मुख्यमंत्री हलक्या कानाचे नसल्याने असे झाले असावे, असे मला वाटत नाही. ४० वर्षे पक्षाचे काम केल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांना मंत्रीपद मिळाले आहे.ते पुढे म्हणाले, पक्षाने मला खूप काही दिले आहे. त्यामुळे मंत्रिपदापासून पक्षाने वंचित ठेवले आहे असे मला वाटत नाही. पडळकर यांनी पक्ष सोडताना माझ्याबाबत बोलायचा विषय नव्हता. मात्र दोघांच्या भांडणात माझ्याबाबत टिपणी केली असावी. मला दोघांच्या भांडणात पडायचे नाही. खरे-खोटे काय आहे, हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट करावे. पडळकर किंवा अन्य कोणीही पक्ष सोडला तरी, पक्षावर परिणाम होणार नाही.आगामी विस्तारात संधी निश्चित मिळेल!जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीत भाजपने यश मिळविले असल्याने, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मला निश्चित संधी मिळेल, असा विश्वास आ. खाडे यांनी व्यक्त केला.
खाडे म्हणाले, मला मंत्रिपदापासून वंचित ठेवण्याएवढे मुख्यमंत्री हलक्या कानाचे नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:50 AM