शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
3
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
4
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
5
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
6
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
7
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
8
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
9
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
10
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
11
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
12
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
13
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
14
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
15
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
16
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
17
कुटुंबाचे कसे होणार? ही चिंता मिटविण्यासाठी...
18
लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण
19
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

खानापूर तालुका मार्चपूर्वी ‘निर्मल’ करा

By admin | Published: February 09, 2016 12:15 AM

अनिल बाबर : विट्यातील कार्यशाळेत सरपंच, ग्रामसेवकांना सूचना

विटा : शौचालय बांधकामासाठी जागा नाही, अगोदर अनुदान द्या, यासह अन्य अडचणी सांगू नका. ज्या ठिकाणी खरोखरच अडचण आहे, तेथे प्रशासनासह आम्ही येऊ. महसूल प्रशासनाचे शौचालय बांधकामासाठी सहकार्य राहील, त्यामुळे खानापूर तालुका मार्चपूर्वी हागणदारीमुक्त झाला पाहिजे, त्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी प्रयत्नशील राहावे, अशी सूचना आ. अनिल बाबर यांनी दिली.येथे खानापूर पंचायत समितीच्यावतीने तालुका शंभर टक्के हागणदारी मुक्त करण्याच्यादृष्टीने आयोजित सरपंच व ग्रामसेवकांच्या कार्यशाळेत आ. बाबर बोलत होते. यावेळी सभापती सौ. वैशाली माळी, उपसभापती सुहास बाबर, जि. प. सदस्य फिरोज शेख, जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलीस निरीक्षक मोहन जाधव उपस्थित होते. या कार्यशाळेत खानापूर तालुका २५ मार्चपूर्वी हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प सोडण्यात आला.आ. बाबर म्हणाले, केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार सांगली जिल्ह्यातील एकही तालुका अद्याप हागणदारीमुक्त झालेला नाही. खानापूर तालुक्याला संधी आहे. त्यामुळे ग्रामसेवक व सरपंचांनी कोणतीही अडचण न सांगता ध्येयाने काम करून तालुका संपूर्ण हागणदारीमुक्त केला पाहिजे. आगामी काळात या कामासाठी प्रयत्न करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांचा प्रशासनाच्यावतीने विशेष सन्मान केला जाईल.रविकांत आडसूळ यांनी, सांगली जिल्ह्यात एकही तालुका हागणदारीमुक्त नसल्याचे सांगून, ग्रामसेवक, सरपंच यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास खानापूर तालुका तसा होण्यास कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. यावेळी आ. बाबर यांनी तालुक्यातील नागेवाडी, खानापूर, लेंगरे, भाळवणी जि. प. गटनिहाय शौचालय बांधकाम, उद्दिष्ट व अडचणींची सरपंच, ग्रामसेवकांकडून आढावा घेतला.काही ठिकाणी वन विभाग आणि गायरान जमिनीत घरांची अतिक्रमणे असल्याने त्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यात अडचण असल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले. भाळवणी परिसरात वाळू मिळत नसल्याने कामे थांबल्याचे माजी सरपंच महेश घोरपडे यांनी सांगितले.निर्मलग्राममध्ये उत्कृष्ट काम केलेल्या सरपंच व ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी संतोष जोशी यांनी स्वागत, सभापती सौ. वैशाली माळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेस पं. स. सदस्य पांडुरंग डोंगरे, सचिता सावंत, सुशांत देवकर, राहुल साळुंखे, चंद्रकांत चव्हाण यांच् यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)निर्मलग्राम पुरस्कार : मिळालाच कसा?या कार्यशाळेत आ. बाबर यांनी, आळसंद गावातील शौचालय बांधकाम उद्दिष्टाबाबत विचारणा केली. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, उपसरपंच प्रा. विलास गोरड व ग्रामसेवक हे तिघेही उठून उभे राहिले. त्यावेळी सरपंच व ग्रामसेवकांत आता तरी ताळमेळ आहे का? असा सवाल आ. बाबर यांनी उपस्थित केला. उपसरपंच प्रा. गोरड यांनी, उद्दिष्टपूर्तीबाबत सांगता येत नाही, परंतु, शौचालये शंभर टक्के नसताना, यापूर्वी आमच्या गावाला निर्मलग्राम पुरस्कार कोणत्या आधारावर दिला? असा सवाल केला. त्यावर आ. बाबर यांनी, पूर्वीचे नियम वेगळे होते, आताची नियमावली वेगळी आल्याचे सांगितले.द्राक्ष बागायतदारच शौचालयाविना : पळशी हे निर्यातक्षम द्राक्षबागांचे माहेरघर समजले जाते. या गावाच्या उद्दिष्टाबाबत चर्चा केली असता, या गावात काही अडचणी आहेत. द्राक्षबाग गेल्यानंतर शौचालय बांधतो, असे अनेकजण सांगतात. त्यामुळे शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याचे ग्रामसेवकाने सांगितले. निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांकडेच शौचालय नसल्याची चर्चा कार्यशाळेत ऐकावयास मिळाली.