शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबादास कागदोपत्री नेता, खैरेंनी आता नातवंडे सांभाळावी; संदीपान भुमरेंची उद्धवसेनेच्या नेत्यांवर निशाणा
2
IPL 2025 DC vs MI: रन आउटची हॅटट्रिक! अन् फायनली रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सनं मारली बाजी
3
"चूक मान्य करुन माफी मागा"; महात्मा फुलेंबाबत केलेल्या विधानावरुन सदावर्तेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर
4
Karun Nair : १०७७ दिवसांनी कमबॅक! इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात IPL मध्ये ७ वर्षांनी ठोकली फिफ्टी!
5
पोटगीची मागणी केल्याने पत्नीसोबत अघोरी कृत्य; गुप्तांगावर जादूटोणा केल्याचे सांगितले अन्...
6
"डोक्याने क्रॅक आहेस का, मी मगासपासून..."; 'त्या' प्रश्नाने संयम सुटताच अजितदादांची तुफान फटकेबाजी
7
आई-मुलाची सकाळची भेट ठरली अखेरची; निवृत्त महिला अधिकाऱ्याची हत्या, नातेवाईक ताब्यात
8
आईच्या बॉयफ्रेंडचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जन्मदातीने पोटच्या पोरीचे व्हिडीओ केले व्हायरल
9
DC vs MI : तिलक वर्मानं ती गोष्ट लयच मनावर घेतलीये; सलग दुसऱ्या फिफ्टीनंतर सेलिब्रेशनमध्ये तेच दिसलं!
10
'वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जातेय, हिंदूंना घराबाहेर...'; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा हल्लाबोल
11
IPL 2025 DC vs MI : रोहित शर्माचा आणखी एक डाव ठरला फुसका: नवख्या पोरानं दिला चकवा!
12
गडकरींचा एक फोन अन् दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शासकीय मदतीचा मार्ग मोकळा
13
विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
धक्कादायक! रेशन कार्ड बनवण्यासाठी गेली, वाटेतच होणाऱ्या पतीसमोर सामूहिक अत्याचार
15
RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न
16
शिक्षण घोटाळ्यात आणखी तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक; घोटाळ्याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत
17
"मृत्युदंड हा इस्लामचा भाग..."; ४ जणांना गोळ्या घालून मारल्यानंतर, काय म्हणाला तालिबान नेता?
18
₹8 वरून ₹81 वर पोहचला हा शेअर, 1 लाखाचे केले ₹10.20 लाख; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
“मित्रांकडून पैसे उधार घेतले, कष्टाने पहिलं घर...”; ‘ते’ दिवस आठवून अभिनेता झाला भावुक
20
शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार! त्यांच्यासह बहिणीवर कारवाई होणार, अटक वॉरंट जारी

Sangli: खानापूर विधानसभेचा दुष्काळ मंत्रिपदाच्या संधीमुळे संपणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 19:43 IST

खानापूर विधानसभा मतदार संघातील दोन सुपुत्र आमदार 

लक्ष्मण सरगरआटपाडी : महाराष्ट्र राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस असे यश प्राप्त झाले आहे. त्या दोनच दिवसांमध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार असून या मंत्रिमंडळामध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघाचा मंत्रिपदाचा दुष्काळ आमदार गोपीचंद पडळकर व सुहास बाबर यांच्या रूपाने संपणार का? याबाबत आटपाडी व खानापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला २३५ जागा मिळत मोठे यश प्राप्त झाले आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील पाच जागेवर महायुतीने यश मिळवले आहे. गेल्या अनेक तपाहून अधिक काळ दुष्काळी भागातील जत व आटपाडी, खानापूर तालुक्यामध्ये मंत्रिपदाची संधी विविध सरकारच्या काळामध्ये मिळालीच नाही. सध्या भाजपाचे बहुजन समाजाचे नेतृत्व आटपाडीचे सुपुत्र गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.

भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव अग्रभागी घेतले जाते. महाराष्ट्र राज्यात भाजपा पक्ष वाढीसाठी व ओबीसी समाजाची मोट बांधण्यात गोपीचंद पडळकरांचा मोठा वाटा आहे. ओबीसी नेतृत्व, सर्व घटकांच्यासाठी काम करण्याची तळमळ, संपूर्ण महाराष्ट्रात असलेली क्रेझ पाहता त्यांना मंत्रिमंडळात संधी पक्की असल्याचे समजते.शिवसेना शिंदे गटाचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांनी मोठा विजय मिळविला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अतिशय विश्वासू शिलेदार असलेले दिवंगत आमदार अनिल बाबर यांची मंत्रिपदी वर्णी लागेल, अशी शक्यता अनेकवेळा वर्तवली जात होती. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावामध्ये अनिल बाबर यांनी प्रथम साथ देत दुष्काळी भागासाठी पाणी योजना पूर्ण करण्याची तळमळ व्यक्त केली होती. सांगली जिल्ह्यात एकमेव आमदार असल्याने यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना मंत्रिपद देऊन पक्ष वाढीसाठी व दुष्काळी पट्ट्यातील मंत्रिपदाचा दुष्काळ संपवतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

दरम्यान, खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दोन्ही सुपुत्र एकाचवेळी आमदार म्हणून निवडून आले असून दोन्ही वेगळ्या पक्षाचे आहेत. दोन्हींच्या रूपात खानापूर विधानसभा मतदारसंघाचा मंत्रिपदाचा दुष्काळ संपणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४khanapur-acखानापूरGopichand Padalkarगोपीचंद पडळकरministerमंत्री