शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

खरसुंडीत भाजप-सेना मुसंडीच्या तयारीत

By admin | Published: January 24, 2017 11:41 PM

खुल्या गटामुळे चुरस : काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अस्तित्वाची लढाई; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

विक्रम भिसे ल्ल खरसुंडीआटपाडी तालुक्यातील खरसुंडी जिल्हा परिषद गट खुला असल्याने अनेक दिग्गज गुडघ्याला बाशिंग बांधून नशीब अजमावण्यासाठी तयार झाले आहेत. यावेळी प्रथमच काँग्रेस व राष्ट्रवादीला टक्कर देऊन भाजप आणि शिवसेना मुसंडी मारण्याच्या तयारीत आहेत. मोर्चेबांधणी करून उमेदवारीसाठी साकडे घालत आहेत. खरसुंडी गटात खरसुंडी पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिलांसाठी, तर घरनिकी गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. खरसुंडी गटामध्ये दोनवेळा कॉँग्रेसचे मोहनकाका भोसले यांनी, तर गत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कुसूमताई मोटे विजयी झाल्या होत्या. येथे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व कॉँग्रेसचे नेते मोहनकाका भोसले या गटामध्ये चुरस असे. विधानसभा निवडणुकीपासून या गटातील चित्र बदलले असून, आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेतून निवडणूक जिंकल्याने सेनेचा गट तयार झाला आहे. आटपाडी तालुक्यात भाजपचे युवक नेते गोपीचंद पडळकर यांनी युती शासनातील वरिष्ठ नेत्यांच्या संबंधातून पुन्हा एन्ट्री केली असून त्यांचाही गट प्रबळ आहे. यामुळे येथील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. एकमेकांची ताकद अजमावण्यासाठी सर्वजण स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करीत आहेत. यामुळे चौरंगी निवडणूक होण्याचे संकेत आहेत. खरसुंडी गटात राष्ट्रवादीचे माजी आ. देशमुख, शिवसेनेचे आ. अनिल बाबर, कॉँग्रेसचे नेते मोहनकाका भोसले, माजी आमदार कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील आणि भाजपचे गोपीचंद पडळकर अशा नेत्यांचे गट गावागावात आहेत.मोहनकाका भोसले यांचे पुत्र जयदीप भोसले यांनी युवक कॉँग्रेसच्या सांगली लोकसभा क्षेत्राच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. त्यांना माजी मंत्री पतंगराव कदम, आ. मोहनराव कदम व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांचे पाठबळ आहे. त्यांच्या उमेदवारीस सदाशिवराव पाटील यांनी हिरवा कंदील दाखविला असल्याने उमेदवारी निश्चित समजून ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत.जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले असल्याने खरसुंडी गटातील अनेक इच्छुकांनी तयारी चालू केली आहे. राष्ट्रवादीतून माजी आ. देशमुख यांचे समर्थक तालुकाध्यक्ष विलास शिंदे, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांची नावे पुढे येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीने विलास नाना शिंदे यांच्या एकाच नावाची पसंती करुन त्यांची शिफारस केल्याचे समजते. भाजपमधून गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मदेव पडळकर, अरुण पडळकर इच्छुक आहेत. नेलकरंजीचे चंद्रकांत भोसले यांनीही लढण्याची तयारी केली असून, गत निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ. अलकाताई भोसले खरसुंडी पंचायत समिती गणातून विजयी झाल्या होत्या. शिवसेनेतून रमेश (बंडू शेठ) कातुरे, सलीम शेख (घरनिकी), साहेबराव चवरे (झरे) इच्छुक आहेत. चवरे ही आ. बाबर यांचे निष्ठावंत समर्थक आहेत. शिवाय माजी उपसभापती विलास पाटील (चिंचाळे) आणि खरसुंडीचे सचिन गुरव हेही इच्छुक आहेत.खरसुंडी पंचायत समिती गणातून जिल्हा बॅँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे यांच्या पत्नी वर्षा देठे कॉँग्रेसमधून, बाजार समितीचे माजी संचालक दिलीप सवणे यांच्या पत्नी जोत्स्ना दिलीप सवणे राष्ट्रवादीतून इच्छुक आहेत. ग्रा.पं. सदस्य सारिका आदिनाथ भिसे, आशालता सूरज कांबळे, प्राची महेश जावीर यांचीही नावे पुढे येत आहेत.