शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

खरसुंडीत बारामतीच्या ट्रकचालकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 11:36 PM

खरसुंडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील घाणंद रस्त्यावर काशिनाथ महादेव गलांडे (वय ४४, रा. निरा-वागज, ता. बारामती, जि. पुणे) या ट्रक चालकाचा अज्ञाताने खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चिंचाळे येथील साठवण तलावात टाकून दिल्याची घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली.बुधवारी दुपारी चिंचाळे साठवण तलावाच्या पुलावरून जाणाऱ्या लोकांना ...

खरसुंडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील घाणंद रस्त्यावर काशिनाथ महादेव गलांडे (वय ४४, रा. निरा-वागज, ता. बारामती, जि. पुणे) या ट्रक चालकाचा अज्ञाताने खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चिंचाळे येथील साठवण तलावात टाकून दिल्याची घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली.बुधवारी दुपारी चिंचाळे साठवण तलावाच्या पुलावरून जाणाऱ्या लोकांना रस्त्यावर रक्त लागलेली चप्पल व पुलाच्या खाली पाण्यात केशरी रंगाचा प्लास्टिकचा कागद आणि दोरी दिसली. त्यामुळे लोकांनी खाली पाण्यात पाहिले असता मृतदेह दिसून आला. मृताच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर मार लागला होता. घटनेची माहिती पोलीसपाटील सचिन मंडले यांनी आटपाडी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढला. खिशात वाहनचालक परवाना मिळाल्याने मृतदेहाची ओळख पटली. हा मृतदेह निरा-वागज येथील काशिनाथ गलांडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.गलांडे यांचा अज्ञाताने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुलावरून साठवण तलावाच्या पाण्यात टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.लवकरच उलगडाखरसुंडी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातून आलेल्या या ट्रक चालकाचा अज्ञाताने कशासाठी खून केला असावा, याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, आटपाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेले खरसुंडी पोलीस दूरक्षेत्र कायमच बंद असल्याने घटनास्थळी आटपाडी पोलिसांना पोहोचण्यास वेळ लागला.