फोटो ओळ :
खरसुंडी (ता. आटपाडी) येथे व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी डॉ. दिनेश घोलप, सरपंच लता पुजारी, सलिमा शिकलगार, अर्जुन सावकार, शशिकांत शिंदे, राहुल गुरव आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत ग्रामपंचायतीने भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, बेकरी व्यावसायिक, हॉटेल कामगार व व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी केली. याला चांगला प्रतिसाद देत ५४ जणांनी चाचणी केली.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश घोलप, सरपंच लता पुजारी, उपसरपंच सलिमा शिकलगार, ग्रामविकास अधिकारी शशिकांत शिंदे, अर्जुन पुजारी, सचिन गुरव यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली.
खरसुंडी गाव आटपाडी तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे, तसेच हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे; परंतु खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. महेश जाधव, डॉ. अभिमन्यू कदम, डॉ. दिनेश घोलप व सर्व आरोग्य कर्मचारी, तसेच अंगणवाडीसेविका यांनी केलेल्या नियोजनामुळे खरसुंडीत कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास यश आले असल्याचे सरपंच अर्जुन पुजारी यांनी सांगितले. या पुढेही नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम व अटींचे पालन करून कोरोनामुक्त खरसुंडी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.