शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

Sangli- कवठेमहांकाळमधील खोत टोळी दोन वर्षासाठी तडीपार; दीड वर्षांत सात टोळ्यांवर बडगा

By अशोक डोंबाळे | Published: September 09, 2023 6:55 PM

सांगली : कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ज्ञानु खोत टोळीला सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली. गणेशोत्सवाच्या ...

सांगली : कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ज्ञानु खोत टोळीला सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी ही सलग तिसरी कारवाई केली. अधीक्षकांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, गेल्या दीड वर्षांत अधीक्षक तेली यांनी सात टोळ्यातील २८ जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. पुढील टप्प्यात आणखी काही जणांवर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.टोळीचा म्होरक्या ज्ञानु अण्णाप्पा खोत (२३, रा. कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ) याच्यासह सुरेश उर्फ अर्जुन महादेव पोतदार (२५, अग्रणी धुळगांव, ता. कवठेमहांकाळ), संदीप भारत पाटील (२०), मारूती दादासो लिंगले (२२, दोघे रा. कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.अधिक माहिती अशी, की आगामी गणेशोत्सवासह विविध सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दल हाय अलर्ट झाले आहे. गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी सराईतांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खोत ही टोळी ही २०२२ पासून सक्रीय होती. गाई चोरीसह अन्य गुन्हे दाखल टोळीवर दाखल आहेत. टोळीची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तडीपारीचा प्रस्तावर सादर करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी दिले होते. त्यानुसार कवठेमहांकाळ पोलिसांनी प्रस्तावर सादर केला. त्यानंतर सुनावणी घेत अधीक्षकांनी सांगलीसह सोलापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपारचे आदेश दिले. यापुढेही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.अप्पर अधीक्षक आंचल दलाल, उपाधीक्षक सुनील साळुंखे, संदेश नाईक, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, कवठेमहांकाळचे निरीक्षक ज्योतिराम पाटील, उपनिरीक्षक सिद्धाप्पा रूपनर, दीपक गट्टे, मनिषा बजबळे यांचा कारवाईत सहभाग होता.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस