सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने सतरा वॅगन्सची किसान रेल सुरु केली आहे. उद्या, शुक्रवारपासून (दि. २१) आठवड्यातून एकदा ती धावेल.पाच वॅगन्सची गाडी क्रमांक ००१०९ ही कोल्हापुरातून मनमाडपर्यंत धावेल. तेथे देवळाली-मुजफ्फरपूर किसान रेल्वेला ती जोडली जाईल. परतताना ००११० या क्रमांकाने मनमाडमध्ये वेगळी होऊन कोल्हापूरला येईल. या गाडीला मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड व अहमदनगर हे थांबे आहेत.
पुढेदेखील जळगाव, भुसावळ, बुऱ्हाणपूर, खंडवा, इटारसी, पिपरिया आदी स्थानकांवर थांबणार आहे. तिला पाच वॅगन्स कोल्हापुरातून व दोन वॅगन्स दौंडमधून जोडल्या जातील. या गाडीला एकूण १७ वॅगन्स आहेत. देवळाली-मुजफ्फरपूर हा तिचा मूळचा प्रवास आहे. कोल्हापुरातून निघालेली किसान रेल मनमाडमध्ये तिला जोडली जाईल.