शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

पतंगरावांचा राजकीय सत्तासंघर्ष अन् दबदबा तब्बल सहावेळा आमदार; अठरा वर्षे मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 1:09 AM

पूर्वाश्रमीचा भिलवडी-वांगी, तर पुनर्रचित पलूस-कडेगाव मतदारसंघ नेहमीच संवेदनशील राहिला आहे. या मतदारसंघातील जनतेने पतंगराव कदम यांना १९८५, १९९०, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा तब्बल सहा निवडणुकांत विजयी केले.

पूर्वाश्रमीचा भिलवडी-वांगी, तर पुनर्रचित पलूस-कडेगाव मतदारसंघ नेहमीच संवेदनशील राहिला आहे. या मतदारसंघातील जनतेने पतंगराव कदम यांना १९८५, १९९०, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा तब्बल सहा निवडणुकांत विजयी केले. या मतदारसंघाचे प्रतिनिधी पतंगराव कदम जवळपास २९ वर्षे आमदार राहिले. यात तब्बल २० वर्षे मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पतंगराव कदम या नावाचा दबदबा राहिला. प्रचंड विकासकामांतून त्यांनी या मतदार संघाचा कायापालट केला.मुख्यमंत्रिपदाची हुलकावणी२००४ च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात आघाडीझाली. डॉ. पतंगराव कदम यांनी तब्बल एक लाखाहून अधिक मताधिक्यानेविजय मिळविला. यावेळी ते मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली आणि विलासराव देशमुख पुन्हा मुख्यमंत्री झाले. यावेळी कदम यांना सहकारमंत्रिपद देण्यात आले.यशवंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षात शंभर कोटींचा निधीनवमहाराष्ट्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने नियोजन करणारे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात १०० कोटींचा निधी विविध योजनांवर आघाडी शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केला होता. विशेष म्हणजे यापैकी २५ कोटींहून अधिक निधी पतंगरावांनी सांगली जिल्ह्यात खेचून आणला होता. या निधीतून यशवंतरावांच्या जन्मगावात म्हणजे देवराष्टÑे आणि सागरेश्वर अभयारण्यात विकासकामे झाली. पतंगरावांचा दबदबाच तेवढा होता.१९९० ला काँग्रेसच्या तिकिटावर विजयीपाच वर्षांत मतदारसंघात केलेल्या कामांचा अफाट आवाका आणि तिकीट न मिळूनही काँग्रेस पक्षाविषयी दाखविलेली अढळ निष्ठा बघून त्यांना १९९० च्या निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट मिळाले. त्यावेळी पहिल्यांदा ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. २९ जून १९९२ रोजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यांच्या आवडीच्या शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी या संधीचे सोने केले. आदिवासींच्या मुलांसाठी आश्रमशाळा, त्यांना मोफत पुस्तके, शाळेतला दुपारचा आहार यासाठी तरतूद केली. एकशिक्षकी शाळा द्विशिक्षकी केल्या.१९६८ मध्ये एस. टी. महामंडळाचे संचालक१९६८ मध्ये यशवंतराव मोहिते परिवहन मंत्री झाले. त्यावेळी मोहिते यांनी कदम यांना १ जुलै १९६८ रोजी एस. टी. महामंडळाचे संचालक केले. २३ वर्षे वयाच्या तरुणाला मोहिते यांनी मोठी संधी दिली. त्यांना महामंडळाची इम्पाला गाडी दिली. या संधीचे सोने करीत पतंगरावांनी गाव तिथे एसटी सुरू केली. ग्रामीण व दुष्काळी भागातील हजारो तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. १९६८ ते १९७३ अशी पाच वर्षे ते संचालक राहिले.अपक्ष म्हणून १९८०ला रिंगणात१९८० मध्ये पतंगराव कदम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. मात्र त्यांचा पोस्टाच्या मतात पराभव झाला.१९८५ च्या  निवडणुकीत आमदारभिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघातून पतंगराव कदम यांनी पुन्हा १९८५ ची विधानसभा निवडणूक लढविली आणि ३० हजार मताधिक्याने विजयी झाले. ते महाराष्ट्रात दुसºया क्रमांकाची मते घेऊन विजयी झाले. आपला माणूस आमदार झाल्याच्या आनंदात भिलवडी-वांगी मतदारसंघात त्यावेळी अक्षरश: दिवाळी साजरी झाली.१९९५ ला पराभवाचा सामनाभिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघातून १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर १९९६ च्या पोटनिवडणुकीत मात्र कदम यांना पराभवाचा सामना करावा लागला.१९९९ च्या निवडणुकीत विजय आणि उद्योगमंत्री१९९९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मात्र पतंगराव कदम काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. यावेळी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना झाला. कदम विजयी झाले. यावेळी त्यांना उद्योग व जलसंधारण खात्याचे मंत्री म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली. १९९९ ते २००३ या कालखंडात विलासराव देशमुख व २००३ ते २००४ सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते. शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी पतंगराव कदम यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होते.वन, मदत व पुनर्वसन खाते२००९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघाच्या पुनर्रचनेत भिलवडी-वांगी मतदारसंघाचे नाव पलूस-कडेगाव असे झाले. यावेळी कदम यांनी ३५ हजार ५८५ मताधिक्याने विजय मिळविला. यावेळी अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री झाले. कदम यांच्याकडे वन, मदत व पुनर्वसन खाते आले. या खात्यालाही कदम यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. वन विभागातील रोजंदारीवरील सात हजार कर्मचाºयांना त्यांनी कायम केले. १०० कोटी वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वीपणे राबविला. 

१२ हजार ५०० कोटींची मदतपतंगराव कदम मदत, पुनर्वसन मंत्री असताना गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळ अशी संकटे आली. त्यावेळी कदम यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली होती. या उपसमितीत नऊ मंत्री आणि सचिव होते. दर मंगळवारी तीन वाजता या उपसमितीची बैठक होत असे. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार बुधवारी परिपत्रक निघत असे. या काळात १२ हजार ५०० कोटींची मदत कदम यांनी अतिवृष्टी व दुष्काळात दिली.महसूलमंत्रीपदी संधीडिसेंबर २००८ मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यावेळी पतंगराव कदम यांना महसूलमंत्री हे सर्वाधिक महत्त्वपूर्ण खाते मिळाले. अर्थात यावेळीही त्यांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली.२०१४ मध्ये गड राखला२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत संपूर्ण राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानिपत झाले. परंतु, कदम यांनी मात्र मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपला गड कायम राखला. त्यांचा २४ हजार इतक्या मताधिक्याने विजय झाला. राज्यात काँग्रेसची सत्ता गेली; मात्र कदम यांनी मात्र विकासकामांची गती कायम ठेवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्व मंत्रिमंडळात त्यांचे सलोख्याचे संबंध होते. पतंगराव कदम या नावाचा दबदबाही कायम होता.संकलन : प्रताप महाडिक, कडेगाव

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र