सांगली : सांगली जिल्हा पूर्वी दक्षिण सातारा म्हणून ओळखला जात होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिली निवडणूक १९५२ साली झाली. त्यावेळी कॉंग्रेसचे व्यंकटराव पवार यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतर १९५७ च्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे बाळासाहेब पाटील विजयी झाले.१९५७ चा अपवाद वगळता १९५२ ते २००९ या काळात झालेल्या १७ पैकी १६ निवडणुकांमध्ये कॉग्रेस विजयी झाले आहे. शिवाय या १६ पैकी ११ लोकसभा निवडणुकीत म्हणजे १९८० ते २००९ या काळात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याने प्रतिनिधीत्व केलेले आहे. दरम्यान, २०१४ साली आलेल्या मोदी लाटेत पहिल्यादा कॉंग्रेसचे माजीमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला. कॉंग्रेसमधून ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करूनही २०१४ च्या निवडणुकीत संजय पाटील विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा संजय पाटील यांनी बाजी मारली. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत.
वर्ष - उमेदवार - पक्ष१९५२ - व्यंकटराव पवार - कॉंग्रेस १९५७ - बळवंत ऊर्फ बाळासाहेब पाटील - शेतकरी कामगार पक्ष१९६२ - विजयसिंहराव डफळे - काँग्रेस१९६७ - एस. डी. पाटील - काँग्रेस१९७१ - गणपती गोटखिंडे - काँग्रेस१९७७ - गणपती गोटखिंडे - काँग्रेस१९८० - वसंतदादा पाटील - काँग्रेस१९८३ - शालिनी पाटील - काँग्रेस१९८३ - प्रकाशबापू पाटील - काँग्रेस१९८९ - प्रकाशबापू पाटील - काँग्रेस१९९१ - प्रकाशबापू पाटील - काँग्रेस१९९६ - मदन पाटील - काँग्रेस१९९८ - मदन पाटील - काँग्रेस१९९९ - प्रकाशबापू पाटील - काँग्रेस२००४ - प्रकाशबापू पाटील - काँग्रेस२००६ - प्रतीक पाटील - काँग्रेस२००९ - प्रतीक पाटील - काँग्रेस२०१४ - संजय पाटील - भाजप२०१९ - संजय पाटील - भाजप
(१९५७ व १९६२ मध्ये मिरज लोकसभा मतदारसंघ होता. १९८३ व २००६ मध्ये पोटनिवडणूक झाली होती.)