मिरज - लाॅकडाऊननंतर मार्चपासून बंद असलेली बेंगळुरू-कोल्हापूर चेन्नम्मा एक्स्प्रेस आठ दिवसांत पुन्हा सुरू होणार आहे. विशेष रेल्वे म्हणून धावणाऱ्या या एक्स्प्रेसमुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
लाॅकडाऊन काळात सहा महिने बंद असलेली चेन्नम्मा एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने निर्देश दिले आहेत. चेन्नम्मा एक्स्प्रेसच्या वेळेत धावणारी ही विशेष एक्स्प्रेस आठ दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोयना, महाराष्ट्र, हुबळी-कुर्ला, यशवंतपूर-निजामुद्दीन, वास्को-निजामुद्दीन एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. अद्याप अनेक एक्स्प्रेस सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. या सर्व रेल्वेगाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस १६ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली आहे. कोल्हापूर-तिरुपती विशेष रेल्वेस मुदतवाढ मिळाली नसल्याने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.