सांगली : कोरोना रूग्णां कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी रेल्वेने पॅसेंजर गाड्यांना हिरवा कंदील अद्याप दर्शविलेला नाही. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांना एसटीने अथवा खासगी वाहनाने जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे.
सांगली व मिरजेतून कोल्हापूर, बेळगाव, पुणे व सोलापूर या मार्गावर दररोज किमान दहा हजार प्रवाशी पॅसेंजरने प्रवास करतात विशेषत: बेळगाव आणि कोल्हापूर पॅसेंजर तुफान भरलेली असते. या प्रवाशांना एता एसटीची महागडी तिकिटे काढून प्रवास करावा लागत आहे. सांगली, मिरज तसेच साताऱ्यातून दररोज किमान अडीच हजार प्रवासी सातार-कोल्हापूर पॅसेंजरने कोल्हापूरला नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने जातात. या सर्वांचे महिन्याचे प्रवासाचे बजेट वाढले आहे.
रेल्वेने पॅसेंजर सुरु करण्याचे कोणतेही संकेत अद्याप दिलेले नाहीत. पॅसेंजरमध्ये प्रचंड गर्दीमुळे सोशल डिस्टन्सींग शक्य होत नाही, त्यामुळे त्यांचा निर्णय झाला नसावा. पुणे, कोल्हापूर बंद
सांगलीकरांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या कोल्हापूर-पुणे, सातारा-कोल्हापूर, मिरज-बेळगाव व मिरज-सोलापूर या पॅसेंजर बंद आहेत. याचा मोठा त्रास प्रवाशांना होत आहे. विशेषत: कोल्हापूर व बेळगावला दररोज हजारो प्रवाशी रेल्वेने जात असतात.एसटीने प्रवासासाठी पाचपट तिकिटाचा भुर्दंड
कोल्हापूर व बेळगावला धावणाऱ्या पॅसेंजर हजारो प्रवाशांसाठी अत्यंत सोयीच्या आहेत. मिरजेतून अवघ्या १५ रुपयांत कोल्हापूरला जाता येते. पण आता एसटीने ७५ रुपये मोजावे लागत आहेत. पुण्यासाठी ७० ऐवजी ३२५ रुपये तर बेळगावसाठी ३० ऐवजी १४० रुपये मोजावे लागत आहेत. सोलापूरसाठी रेल्वेने ५५ रुपयांत जाता यायचे. एसटीसाठी तब्बल २१० रुपये द्यावे लागत आहेत.मोजक्याच गाड्या सुरु
सध्या कोल्हापूर-मुबंई कोयना, हुबळी-एलटीटी मुंबई, वास्को-निजामुद्दीन, यशवंतपुरहून अजमेर, जोधपूर, गांधीधाम, निजामुद्दीन या मोजक्याच एक्सप्रेस सुरु आहेत. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया प्रवाशांअभावी बंद करण्यात आली. आरक्षणाविना या एक्सप्रेसमधून प्रवास करता येत नाही.
---------------