मिरज : सातारा ते कोरेगाव रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी कोल्हापूर ते पुणेदरम्यान पॅसेंजर व एक्स्प्रेस तब्बल एक महिना बंद करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.दुहेरीकरणाच्या कामासाठी दि. ४ फेब्रुवारी ते दि. २ मार्चपर्यंत कोल्हापूर-पुणे व पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. दि. २६ जानेवारीपासून बंद केलेल्या सातारा-पुणे व पुणे-सातारा पॅसेंजर पुढे २ मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. दि. ४ फेब्रुवारी ते दि. २ मार्चपर्यंत कोल्हापूर-सातारा पॅसेंजर व सातारा-कोल्हापूर पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या महिनाभर बंद न ठेवता या गाड्या कोल्हापूर ते कऱ्हाडपर्यंत सुरू ठेवाव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांतर्फे मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.