कोकरूड : लॉकडाऊन काळात कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका शिराळा पश्चिम भागाला बसला. कोरोना लसीचा प्रारंभ याच विभागातून होत आहे. हे दिलासादायक असल्याचे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
कोकरूड (ता. शिराळा) येथे ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरणास प्रारंंभ करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
आमदार नाईक म्हणाले, कोरोनाच्या काळात शिराळा तालुक्यातील अनेक गावे हॉटस्पॉट बनली होती. अशा वेळी लोकांना आत्मविश्वास देण्याचे काम आरोग्य विभागाने केले आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस यांनीदेखील महत्त्वाची भूमिका बजावली.
पहिली लस सुरक्षारक्षक शशिकांत सपकाळ यांना आरोग्यसेविका एस.एस. माने यांनी दिली. आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांनी स्वागत केले.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, आशाताई झिमुर, सभापती वैशाली माने, तहसीलदार गणेश शिंदे, प्रशिक्षित जिल्हाधिकारी आरोही सिंह, साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, उपसरपंच पोपट पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, डॉ. एस.ए. इनामदार, डॉ. सनी जाधव, डॉ. विठ्ठल घुले, डॉ. डी.एस. चिलवन, डॉ. अनिल गायकवाड, एस.ए. चौगले, राजेंद्र ठोंबरे, रमेश कुंभार, तानाजी घोडे आदी उपस्थित होते.
फोटो-२३कोकरुड१
फोटो ओळ : कोकरूड (ता. शिराळा) येथील आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शन केले.