शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कोयना एक्स्प्रेस विजेवर धावली, १५ मिनिटे आधी मिरजेत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 5:10 PM

मिरज - पुणे-मिरज-कोल्हापूर या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाल्यानंतर मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस प्रथमच विजेवर धावली. पुणे स्थानकातून दुपारी १२ ...

मिरज - पुणे-मिरज-कोल्हापूर या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाल्यानंतर मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस प्रथमच विजेवर धावली. पुणे स्थानकातून दुपारी १२ वाजून ४० मिनीटांनी निघालेली कोयना एक्स्प्रेस मिरज स्थानकात सायंकाळी ६ वाजून ४५ मिनीटांनी सहा तासात पोहचली. नेहमीच्या पोहचण्याच्या वेळेपूर्वी १५ मिनीटे लवकर गाडी मिरज स्थानकात विद्युत इंजिनसह मिरजेत पोहोचली. यामुळे मिरज-पुणे मार्गावर कोयनेसह महालक्ष्मी, गोंदिया एक्स्प्रेस विद्युत इंजिनावर धावणार आहेत.रेल्वे प्रशासनाने दि.५ पासून महालक्ष्मी एक्स्प्रेस विद्युत इंजिनावर सुरू करण्याची तयारी केली होती. मात्र महालक्ष्मी एक्स्प्रेस पूर्वीच रविवारी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस मुंबईतून आपल्या निर्धारित वेळेत निघाली. पुण्यातूनही विद्युत इंजिनावर ताशी शंभर किलोमीटर वेगात ही एक्स्प्रेस मिरज स्थानकात वेळेपुर्वीच येऊन पुढे कोल्हापूर कडे रवाना झाली.

पुणे-मिरज पर्यंत कोणताही अडथळा न येता गाडी विजेवर धावल्याची माहिती कोयनाचे इंजिनचालक बी. रामबापू यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक चालक प्रदीप नायक, एम. के. सैन, सागर काशिद उपस्थित होते. पुणे ते कोल्हापूर पर्यंत विना अडथळा विद्युत इंजिनावर धावल्याने आता कोल्हापूर व मिरजेतून अनेक एक्स्प्रेस गाड्या विजेवर सुरु होणार आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे