ओळ:- पुणे येथे मुख्य अभियंतापदी हणमंत गुणाले यांची पदोन्नती झाल्याने त्यांचा सत्कार जे. के. (बापू) जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुधीर जाधव, क्रांतिकुमार जाधव, श्रीनिवास गोणे, अनिलकुमार जाधव उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
दुधोंडी : कृष्णा कालव्यास विशेष दुरुस्ती कामास प्राधान्य देऊन निधी उपलब्ध करून काम मार्गी लावू असे आश्वासन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पूर्णतः क्षारपड झाल्या आहेत याची गंभीर दखल घेऊन कृष्णाकाठ उद्योग समूहाचे जे. के. (बापू) जाधव यांनी मुख्य अभियंता गुणाले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
यावेऴी जे. के. बापू जाधव यांनी कृष्णा कालवा हा खोडशीपासून सुरू होतो. तो वसगडे बंधाऱ्यापर्यंत संपतो. या कालव्याची एकूण लांबी ८६ कि.मी. इतकी असून, कृष्णा कालवा हा ९० टक्के काळ्या मातीमध्ये असल्याने ४८ ते ६४ किमीमध्ये ठिकठिकाणी पाझर असल्याची माहिती दिली.
यावेळी पुणे जलसिंचन विभागाचे मुख्य अभियंतापदी गुणाले यांची पदोन्नती झाल्याने त्यांचा सत्कार जे. के. (बापू) जाधव, युवा नेते सुधीर जाधव, क्रांतिकुमार जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पुण्याचे उद्योजक श्रीनिवास गोणे, अनिलकुमार जाधव, राहुल सोनवणे, निखिल जाधव, अमोल जाधव, पुण्याचे मिलिंद जाधव, जनार्दन नलवडे, अमोल घोरपडे, संग्राम जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.