शिरटे : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. सुरेश भाेसले यांच्या मार्गदर्शनाखाली २०१९-२० या हंगामात कारखान्याने १००.२३ टक्के गाळप क्षमतेचा वापर करत, १२.६१ टक्के साखर उतारा घेतला आहे. क्षमतेत ५.९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. साखर तयार करण्यासाठी फक्त १५.३९ टक्के बगॅसचा वापर केला आहे.
दरम्यान, कारखान्याचे टेंभू (ता. कऱ्हाड) येथील ऊसउत्पादक अशोक जाधव यांना जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेतल्याबद्दल दक्षिण विभागात खोडवा हंगामात पहिल्या क्रमांकाचा ‘ऊसभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. जाधव यांनी हेक्टरी २९२.५० टन उसाचे उत्पादन घेतले आहे.
धावरवाडी (ता. कऱ्हाड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याचे सासपडे (जि. सातारा) येथील ऊस उत्पादक चंद्रकांत हणमंत यादव यांनी हेक्टरी २७८.३९ टन उसाचे उत्पादन घेऊन ‘ऊसभूषण’ पुरस्काराचा मान मिळविला आहे.
.........................................
फोटो-०८०१२०२०-आयएसएलएम-डॉ. सुरेश भाेसले व
फोटो-०८०१२०२०-आयएसएलएम-कृष्णा कारखाना