शिरटे : कारखान्याने कमी दिवसात विक्रमी उसाचे गाळप केले आहे. उसाला विक्रमी दर दिला आहे. पाच वर्षात चार वेळा कामगारांना पगार वाढ देणारा ‘कृष्णा’ हा एकमेव साखर कारखाना आसल्याचे मत कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.अतुल भाेसले यांनी व्यक्त केले.
किल्ले मच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील पोळ होते. कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील, सुजित मोरे, पांडुरंग होनमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी सरपंच अनिल जाधव, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साळुंखे, निवास सपकाळ यांनी यावेळी सहकार पॅनलमध्ये प्रवेश केला.
उपाध्यक्ष जगदिश जगताप म्हणाले की, यशवंतराव मोहिते पतसंस्थेची वसुली कृष्णा कारखान्याने थांबवली आणि त्यामुळे पतसंस्था अडचणीत आली, असे डॉ. इंद्रजीत मोहिते सांगत आहेत; परंतु कुठलाही साखर कारखाना पतसंस्था कर्जाची वसुली करून देतो का? हे पण सांगण्याचे धाडस त्यांनी करावे.
सुनील पोळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, मनोज पाटील, प्रशांत रणदिवे, विश्वजीत पाटील, सतीश पाटील, हणमंत पाटील, महादेव इंगवले, आनंदराव जाधव, गणि सय्यद, बाबासाहेब पाटील उपस्थित होते. उपसरपंच व्यंकटराव जाधव यांनी आभार मानले.