शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

सांगलीत कृष्णेने इशारा पातळी गाठली, वारणेला पूर; कोयनेतून ३२,१०० तर वारणेतून १५,७८५ क्युसेकने विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 1:15 PM

दोन हजार नागरिक, २७८२ पशुधनाचे स्थलांतर, कृष्णेची पाणीपातळी स्थिरची शक्यता

सांगली : वारणा (चांदोली), कोयना धरणक्षेत्रात शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाने उघडीप दिल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पण, सायंकाळीनंतर पुन्हा धरणक्षेत्रासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू झाली. कोयना धरण ७७.७६ टक्के भरल्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडून ३२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सांगली आयर्विन पूल येथे कृष्णा नदीने ४० फुटांपर्यंतची इशारा पातळी गाठली आहे. वारणा धरण ८९ टक्के भरल्यामुळे तेथूनही १५ हजार ७८५ क्युसेक विसर्ग सुरू आहे.धरण क्षेत्रासह जिल्ह्यातील धुवाधार पावसामुळे कृष्णा व वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडू लागले आहे. सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांतील १०४ गावांतील नागरिकांच्या चेहऱ्यांवर भीती दिसत आहे. या चार तालुक्यांतील ४९७ कुटुंबांतील दोन हजार ७८२ लोकांचे स्थलांतर केले आहे. सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, काकानगर, मगरमच्छ कॉलनी, जामवाडी, वखारभाग येथील ५६ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. हजारो पशुधनालाही सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असून, नदीकाठची हजारो एकरावरील पिके पाण्याखाली गेली आहेत.

दोन हजार नागरिक, २७८२ पशुधनाचे स्थलांतर..पूरस्थितीचा धोका असलेल्या वाळवा, मिरज, पलूस आणि शिराळा या चार तालुक्यातील १८ गावांतील नागरिकांनी स्थलांतर केले आहे. शुक्रवार संध्याकाळपर्यंत ४९७ कुटुंबांतील दोन हजार ३५ नागरिकांचे स्थलांतर केले आहे. या नागरिकांना निवारा केंद्र, जिल्हा परिषद शाळांमध्ये राहण्याची सोय केली आहे. दोन हजार ७८२ पशुधन सुरक्षित स्थळी हलविले आहे.

जिल्ह्यात ३४.८ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ३४.८ मिलिमीटर, तर सर्वाधिक शिराळा तालुक्यात ९३.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांतील पाऊस व कंसात १ जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : मिरज ३६.२ (४२०.५), जत ४.५ (२७१.७), खानापूर १८.९ (३३६.८), वाळवा ५७.७ (६४३.६), तासगाव ३०.४ (४१५.८), शिराळा ९३.२ (९४०.५), आटपाडी २.९ (२४३.३), कवठेमहांकाळ १२.५ (३७४.९), पलूस ३१.८ (४५१.८), कडेगाव २३.२ (४३४).

२५ पूल, बंधारे, ४६ रस्ते पाण्याखालीपूरस्थितीमुळे जिल्ह्यातील २५ पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. याशिवाय ४६ रस्त्यांवर पाणी आल्याने ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत सायंकाळीही वाढ होत असल्याने आणखी काही रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील पाणीपातळीपाणी पातळी - फूट इंचांमध्येकराडचा कृष्णा पूल २४.०९बहे पूल १२.११ताकारी पूल ४३.६भिलवडी पूल ४२.०६आयर्विन ४०अंकली पूल ४३म्हैसाळ बंधारा ५०राजापूर बंधारा ४९.०१राजाराम बंधारा ४५.११

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसfloodपूर