बोरगाव: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, कृष्णा नदी पात्र दुथडी वाहत असल्याने नदी काठावर पाणीचपाणी पहायला मिळत असल्याने जनतेतून आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे याच पाण्याचा गैरवापर करून पाण्याची नासाडी ही केली जात आहे.सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ तालुक्यात व राज्याच्या अनेक भागांत टॅकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. उन्हाच्या दाहकतेने नद्या, विहीरी, ओढे, कॅनाल ही कोरडे ठणठणीत पडले आहेत. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण व भटकंती करावी लागत आहे. माणसा बरोबर जनावरांच्या ही चाऱ्याचा व पाण्याचा गंभीर प्रश्न रूप धारण करत आहे.काही भागातील शेतातील उभी पिके पाण्याविना करपू लागली आहेत. अशा भीषण परिस्थितीत उद्भवली असताना कृष्णा नदी काठावरील नागरिकांना मात्र पाणीच पाणी उपलब्ध होत असल्याने पाण्याची कोणत्याच प्रकारची झळ बसताना दिसत नाही. हि बाब कृष्णा नदी काठावरील नागरिकांनी भाग्यशाली ठरत आहे. कृष्णा नदी दुथडी वाहत असल्याने नदी काठावरील बोरगाव, रेठरेहरणाक्ष, ताकारी, बहे, तांबवे नरसिंहपूर, वाळवा, भिलवडी पर्यंतच्या भागात पाणीच पाणी आहे.
कृष्णाकाठावरील मुबलक पाण्यामुळे नदीकाठावरील जनता स्वत:लागली भाग्यशाली समजत आहे. अशी परिस्थिती असताना काही ठिकाणी पाण्याचा विनियोग व पाण्याची नासाडी चालल्याचे चित्र ही कृष्णा काठावर पाह्यला मिळत आहे. नागरिकांनी पाणी टंचाई भागाची परिस्थिती डोळ्या समोर आणावी व पाण्याचा गैरवापर व नासाडी थांबवावी. - भागवत जाधव, अध्यक्ष वाळवा तालुका शेतकरी संघटना