शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

कृष्णा, वारणा महापुराच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:12 PM

सांगली : कोयना व वारणा धरणातील विसर्ग वाढतच असल्याने कृष्णा, वारणा नद्यांची वाटचाल आता महापुराच्या दिशेने सुरू झाली आहे. ...

सांगली : कोयना व वारणा धरणातील विसर्ग वाढतच असल्याने कृष्णा, वारणा नद्यांची वाटचाल आता महापुराच्या दिशेने सुरू झाली आहे. दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असल्याने नदीकाठी ‘सतर्कतेचा इशारा’ दिला आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्ग, पूल, पिके, घरे पाण्याखाली जात असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.वारणा धरणातून २० हजार ४७२, तर कोयना धरणातून ६१ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा व वारणा नद्यांच्या पातळीत रविवारी मोठी वाढ झाली. जिल्ह्यात ठिकठिकाणी कृष्णा नदीच्या पाणीपातळीने ‘धोकादायक पातळी’कडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २८ प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वेसेवाही विस्कळीत झाल्याने अनेक ठिकाणी प्रवासी अडकून पडले आहेत. जिल्ह्यात भिलवडी, ताकारी, सांगली, मिरज याठिकाणी कृष्णेच्या पुराचे पाणी लोकवस्तीत शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले आहे. नदीकाठच्या अनेक नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. शासकीय स्तरावरही तात्पुरते स्थलांतर सुरू करण्यात आले आहे.जिल्ह्यात रविवारीही सर्वत्र संततधार सुरूच होती. आटपाडी, जत, खानापूर, कवठेमहांकाळ या दुष्काळी भागासह सांगली, मिरज, शिराळा, वाळवा, तासगांव, पलूस, कडेगाव याठिकाणीही पावसाने हजेरी लावली होती. दिवसभर पावसाची रिपरिप आणि वाढणाऱ्या नदीपातळीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील दोन्ही नद्यांच्या काठावरील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.----------जिल्ह्यात ९९३ पूरग्रस्तांचे स्थलांतरआपत्ती व्यवस्थापन केंद्राकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण २४१ कुटुंबांतील ९९३ लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामध्ये वाळवा तालुक्यातील १४४, शिराळा तालुक्यातील ६६, पलूसमधील २६९, मिरज तालुक्यातील ९९ व महापालिका क्षेत्रातील ४१५ इतक्या पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याशिवाय हजारो लोकांनी स्वत:हून नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे. ----------एकूण २८ मार्ग बंदजिल्ह्यातील एकूण २८ प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. त्यामध्ये ६ राज्यमार्ग, १५ प्रमुख जिल्हा मार्ग, ६ इतर जिल्हा मार्ग, १ ग्रामीण मार्गाचा समावेश आहे.रेल्वे वाहतूक विस्कळीतकोल्हापूरजवळ पंचगंगा नदीवरील रेल्वेपुलाजवळ धोक्याच्या पातळीपर्यंत पुराचे पाणी आल्याने मिरज-कोल्हापूरदरम्यान होणारी रेल्वे वाहतूक रविवारी दुपारपासून बंद झाली. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.भिलवडी बाजारात पाणीभिलवडी (ता. पलूस) येथे रविवारी पहाटे कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्याचबरोबर भिलवडी बाजारपेठेसह, मौलानानगर परिसरात पुराचे पाणी घुसले. दिवसभर सुरू असलेला संततधार पाऊस आणि पुराच्या धास्तीमुळे कृष्णाकाठच्या गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.---------------कृष्णा नदीची पाणीपातळी (फूट)बहे १६.८ताकारी ४९.३भिलवडी ४७.३सांगली आयर्विन ४१.१०अंकली ४५.३म्हैसाळ ५१.६या मार्गावरील वाहतूक बंदजिल्ह्यात कांदे-मांगले पूल, अमणापूर पूल, कुंडल-सांगली रोड (खंडाळा, पळशी, कºहाडमार्गे), पुसेसावळी-वांगी-देवराष्टÑे-कुंडल रस्ता, भिलवडी-अंकलखोप रस्ता, सागाव-कांदे रस्ता, मांगले-काखे पूल, कुंडलवाडी-तांदुळवाडी रस्ता, मोरणा नदी पूल, खेर्डेवाडी-तोंडोली-सोहोली (महादेव ओढा), कांदे पूल, माधवनगर-डिग्रज-ब्रह्मनाळ रस्ता, विहापूर नाला (सागरेश्वर ते राज्य महामार्ग १४२ ला जोडणारा), शित्तूर पूल, काखे रस्ता, कडेगाव-इस्लामपूर रस्ता, पुणदी पूल, शिराळा-आरळा-गुढे-सातारा जिल्हा मार्ग, बहे पूल, सागाव-सुरूल पूल, शाळगाव पूल, नेर्ली पूल (कडेगाव ते अपशिंगे रस्ता), चिंचणी पूल (कडेगाव ते पाडळी), कडेगाव ते कºहाड रस्ता, बिळाशी-सागाव ग्रामीण मार्गावरील वारणा नदीवरील पूल बंद झाले आहेत.