शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

कृष्णा व्हॅली चेंबरच्या निवडणुकीत सत्ताधारीच पुन्हा कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:25 AM

कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने सर्व बारा जागा ...

कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने सर्व बारा जागा जिंकून चेंबरवर पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. निवडणुकीनंतर झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून शिवाजी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी उद्योजक जयपाल चिंचवाडे यांची निवड झाली.

कृष्णा व्हॅली चेंबरची ही निवडणूक चेंबरचे कुटुंबप्रमुख शिवाजी पाटील आणि उद्योजक सतीश मालू यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली. निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात अनंत चिमड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. विरोधी गटाचे ते एकमेव उमेदवार होते. बारा जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती.

या निवडणुकीत सत्ताधारी गटातील विजयी उमेदवार असे : नितीश आशिष शहा (२२५), शिवाजी जोती पाटील (१८७), जयपाल दत्तू चिंचवाडे (२३०), हरी नागेंद्र गुरव (२३०), अरुण हणमंत भगत (२२९), बाळासाहेब एस. पाटील (२२६), दीपक नंदकिशोर मर्दा (२२७), रतिलाल मनजीभाई पटेल (२२०), हेमलता फुलचंद शिंदे (२२३), रमेश गुंडु आरवाडे (२३१), गुंडु विठोबा एरंडोले (२१२), सतीश नेमिचंद मालू (२२८). विरोधी गटाचे उमेदवार अनंतकीर्ती चिमड यांना ९० मते मिळाली.

निवडणूक निकालानंतर संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्ष म्हणून कुटुंबप्रमुख शिवाजी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी उद्योजक जयपाल चिंचवाडे यांची निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी गुंडू एरंडोले यांची निवड करण्यात आली. निकालानंतर चेंबरच्या आवारात नूतन पदाधिकारी व उद्योजकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

चौकट

अदृश्य शक्तीमुळे निवडणूक लागली...

कृष्णा व्हॅली चेंबरची यंदाची निवडणूक ऐतिहासिक अशी झाली. आमचेच मित्र अनंत चिमड यांनी निवडणुकीमध्ये विरोध केला. परंतु, ते कालही आमचे होते आणि आजही आमचेच आहेत. त्यांचा काही दोष नाही. परंतु, ही निवडणूक लागण्यामागे एक अदृश्य शक्ती काम करीत असल्याचे जाणवले. कालांतराने हे उद्योजकांच्या लक्षात येईल. उद्योजकांच्यात कोणतेही गट-तट नसतात. आम्हाला मिळालेला विजय हा उद्योजकांसाठी केलेल्या कामाची पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया निवडणूक निकालानंतर मावळते अध्यक्ष सतीश मालू यांनी व्यक्त केली.

फोटो : २० कुपवाड १

ओळ : कुपवाड एमआयडीसीतील कृष्णा व्हॅली चेंबरच्या निवडणुकीनंतर सत्ताधारी पॅनेलने गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.