विटा : खानापूर तालुक्यातील चिंचणी (मंगरूळ) परिसरात असलेल्या ओसाड व उजाड माळरानात आ. अनिल बाबर यांच्या प्रयत्नांतून व टेंभू योजनेच्या माध्यमातून कृष्णामाईचे आगमन झाले आहे. या परिसरात आता हरितक्रांतीचे नवे पर्व सुरू होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.
टेंभू योजनेच्या प्रकल्पांतर्गत लघुवितरिका क्र. ३ मधून चिंचणी (मं.) येथील ओढापात्रात पाणी सोडण्यात आले. या पाण्याचे पूजन माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बबन पाटील, अशोक निकम उपस्थित होते.
सुहास बाबर म्हणाले की, चिंचणी येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून टेंभू योजनेच्या पाण्याची चातक पक्षाप्रमाणे प्रतीक्षा करीत होते. आता चिंचणीच्या ओढा पात्रात सोडलेले टेंभूचे पाणी पाहून समाधान लाभत आहे. सगळ्या विकासकामांपेक्षा पाण्याचे काम किती महत्त्वाचे आहे, याची आता जाणीव होत आहे. चिंचणी ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असलेल्या रेणुका देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामही येत्या दोन ते तीन महिन्यांत मार्गी लागेल.
या कार्यक्रमास सुबराव निकम, शहाजी निकम, आनंदराव निकम, सचिन पाटील, धनाजी निकम, सचिन निकम, रामेश्वर सुर्वे, सुरेश सुर्वे, शशिकांत माने, बाबू पवार, भगवान पवार, गणपतराव शिंदे, आनंदा माने, डॉ. नामदेव माने, परशराम निकम, शिवाजी निकम, उत्तम निकम, नवनाथ भगत, उत्तमराव पाटील, भगवान शिंदे, महादेव निकम, शिवाजी वारकरी, सुनील निकम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.