अपूर्वा व आदित्य यांनी आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांतून यश मिळविले असून, बेळगाव येथे झालेल्या सलग २४ व ५२ तास स्केटिंगच्या विश्वविक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्यांच्या या विश्वविक्रमांची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह एशिया बुक रेकॉर्डस्, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्, ग्लोबल रेकॉर्डस, चिल्ड्रन्स रेकॉर्डस, इंडियन ॲचिव्हर्स बुक ऑफ रेकॉर्डस्, युनिक वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद झाली आहे.
अपूर्वा हिने स्केटिंगबरोबरच तायक्वांदो, तलवारबाजीमध्येही यश मिळविले आहे. आदित्यनेही स्केटिंगबरोबरच तायक्वांदोचेही प्रशिक्षण घेतले आहे. अपूर्वा व आदित्य गायकवाड यांना सागर साळुंखे, माया साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. अपूर्वा ही पलूस येथे आर्टस्, कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेजमध्ये बी.एस्सी.चे शिक्षण घेत आहे.
संस्थेचे अध्यक्ष
रामचंद्र पाटील, सचिव, धोंडीराम शिंदे,
प्राचार्य डॉ. आर. एस. साळुंखे व क्रीडाशिक्षक प्रा. व्ही. बी. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. आदित्य गायकवाड हा इस्लामपूर येथील ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असून, त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील, संचालक केदार पाटील व धनंजय पाटील, प्राचार्या वैशाली थोरात व क्रीडा शिक्षक सागर साळुंखे, सचिन साळुंखे यांनी अभिनंदन केले.
फोटो-२१दुधोंडी०१