शेटफळे (ता.आटपाडी ) येथे जिल्हा परिषद शाळेत देखणे हॅण्डवॉश स्टेशन उभारले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मॉडेल स्कूल उपक्रमात कुरळप (ता.वाळवा) शाळेने आघाडी घेतली आहे. लॉकडाऊनमध्ये जिल्हाभरात शाळा बंद असल्याच्या काळात तेथे पायाभूत सुविधांची कामे गतीने केली जाणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली.
जिल्हा परिषदेच्या १४१ प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येत आहेत. डुडी यांनी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. कामांच्या प्रगतीसाठी नियमित पाठपुरावा करत आहेत. ते म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये शाळा बंद आहेत, याचा फायदा घेत, तेथे पायाभूत सुविधांची कामे पूर्ण केली जाणार आहेत. क्रीडांगण, हॅण्डवॉश स्टेशन, स्वच्छतागृहे, क्रीडासाहित्य, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्टाफरूम आदी सोयी दिल्या जाणार आहेत. प्रत्येक गावातील कामाच्या प्रगतीचा आढावा नियमितपणे घेतला जात आहे. संबंधित गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, त्या-त्या गावचे सरपंच, शाळा समितीला नियमित बैठका घेण्यास सांगितले आहे. मी स्वत: काही गावांत जाऊन आढावा घेणार आहे. डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आहे. या उपक्रमात कुरळप गावाने आघाडी घेतली असून, बरीच कामे पूर्ण झाल्याचे डुडी म्हणाले.