सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात असलेल्या शिवशक्ती काॅलनीत बंद घर फोडून चोरट्यांनी रोख ५७ हजार रुपयासह सोन्या-चांदीचे दागिने असा ६० हजार ७०० रुपयाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी विनोद श्रीकांत ढंग यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फॅब्रिकेशनचा व्यवसाय असलेले ढंग शामरावनगर येथील शिवशक्ती काॅलनीत राहण्यास आहेत. मंगळवार दि. २० रोती ते कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. या कालावधीत घरी कुणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला व घरातील रोख ५७ हजार रुपये, सोन्याचे बदाम व चांदीचे तोडे असे दागिनेही लंपास केले. ते परगावहून परतल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.