कुरळप येथे शासनाच्या प्रशिक्षण भेट योजनेच्या अंतर्गत मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक यांच्या कार्यालयासाठी ग्रामपंचायतीने आठ गुंठे जागा दिली होती. त्या अनुषंगाने कृषी विभागाने सन १९८४-८८ मध्ये कृषी कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम केले होते. या कार्यालया अंतर्गत कुरळप परिसरातील २२ गावांचा कार्यभार असून कृषी सहायकाकडे एक गावाचा अधिक भार होता.
दहा-बारा वर्षे या कार्यालयामधून शेतकऱ्यांच्या अडचणी जागेवरच मिटत होत्या. शिवाय, शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहितीही वेळेवर मिळत होती. १९९८ मध्ये शासनाने एक खिडकी योजना सुरू केली. त्यामुळे कृषी विभागाचे सर्व कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी गेली कुरळप येथील असणारे कृषी कार्यालय व निवास स्थाने बंद झाली. लाखो रुपये खर्चून बांधलेल्या इमारती धूळखात पडल्या बंद पडलेल्या कृषी कार्यालय शेतकऱ्यांच्या अडचणी निर्माण झाल्या
दरम्यान, करो ग्रामपंचायतीने कृषी कार्यालयाला दिलेल्या आठ गुंठे जागेतील काही जागेवर शासनाची अधिकृत परवानगी न घेताच कैकाडी महाराज समाज मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ ११ जुलै रोजी करून बांधकामस सुरुवात केल्याने तत्काल कृषी विभागाने अनधिकृत बांधकाम केल्यास कारवाईचा इशारा फलक लावला.
एकाच जागेवर दोन शासकीय कार्यालयात संघर्ष सुरू झाल्याने ग्रामस्थांत चांगलीच चर्चा रंगली आहे.
कोटसंबंधित जागा शासनाच्या नावावर असून कोणीही परवानगीशिवाय अतिक्रमण करू नये. अतिक्रमण करणाऱ्यांना कृषी विभागामार्फत नोटीस ही दिली आहे. ग्रामपंचायतीस जागा हवी असेल तर विहित कार्यपद्धतीने शासनाच्या मान्यतेने जमीन वर्ग करून घ्यावी.
- भगवानराव माने, तालुका कृषी अधिकारी
कोट
कृषी विभागाच्या जागेत अतिक्रमण नाही. या विभागाने आपली जागा मोजून घ्यावी. उर्वरित जागेवर ग्रामपंचायत कैकाडी समाज मंदिराचे बांधकाम करण्याचा विचार आहे रीतसर मागणी शासनाकडे करून मंदिरासाठी जागा देऊ
- पंडित पाटील, माजी सरपंच