सुरेंद्र दुपटे
संजयनगर /सांगली : सांगली शहरातील पद्मभूषण वसंत दादा पाटील शासकीय रुग्णालयातील प्रवेशद्वारातील पोर्चचा मोठा स्लॅब ढासळला. रात्रीची वेळ असल्याने मोठी दुर्घटना टळली. ही इमारत जुनी आहे, यामुळे हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय रुग्णालयातील इमारतीची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे
कर्नाटक महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातून या ठिकाणी उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. मध्यरात्री पावणेबाराच्या सुमाराला पोर्चचा मोठा स्लॅब ढासळला आहे. रात्रीची वेळ असल्याने मोठी दुर्घटना टळली. त्वरित सिव्हिल प्रशासनाने इमारतीची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय दवाखानाच्या जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, अशी मागणी नागरिक जागृती मंच,सांगलीतर्फे सतिश साखळकर यांनी केली आहे. सतिश साखळकर म्हणाले, सोमवार दि 12 एप्रिल 2021 रात्री 11 नंतर सांगली येथील वसंतदादा पाटील सिव्हील हॉस्पिटलचा पोर्च अचानक ढासळला आहे रात्रीची वेळ असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सांगली जिल्हा तसेच शेजारील कोल्हापूर. तसेच कर्नाटक राज्यांतून उपचारासाठी रुग्ण तेथे येत असतात.
भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये ह्यासाठी जुन्या संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे व अनुषंगिक कामे तात्काळ निधी उपलब्ध करून करण्यात यावीत यासाठी पालकमंत्री जयंत पाटील, कृष्षी राज्यमंत्री विश्वजित कदम,आमदार सुधीर गाडगीळ व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन सिव्हिल साठी निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे नागरिक जागृती मंच,सांगलीतर्फे सतीश साखळकर यांनी सांगीतले.