कोकरुड : कोकरुड (ता. शिराळा) येथील प्रति खासबाग मैदानाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मंगळवार दि. १६ रोजी या ठिकाणी भव्य कुस्ती मैदान होणार आहे. लाखो रुपये खर्च करुन या कुस्ती मैदानाची उभारणी करण्यात आली आहे. पंचक्रोशीतील हजारो कुस्तीशौकीन या मैदानाला प्रतिवर्षी हजेरी लावणार आहेत.सुमारे पाच ते सहा एकरामध्ये या कुस्ती मैदानाचा परिसर आहे. खासदार अविनाश पांडे यांच्या फंडातून १५ लाख रुपये खर्च करुन मैदानाभोवती दगडी संरक्षक भिंत, आर. सी. सी. मध्ये आखाडा, प्रेक्षक गॅलरी, उतारावर वेगवेगळ्या टप्प्यांची रचना करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या धर्तीवर या मैदानाची रचना आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून ५0 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी या मैदानाला काही महिन्यात उपलब्ध होणार आहे. या निधीचा वापर करुन सुसज्ज असे कुस्ती मैदान याठिकाणी साकारणार आहे. शिराळा, वाळवा, शाहूवाडी तालुक्यातील हजारो मल्ल व कुस्ती शौकिनांचे स्वप्न यामुळे पूर्ण होणार आहे. कोकरुड गावाला कुस्तीची मोठी परंपरा आहे. पूर्वीच्याकाळी बाबू शिंदे, पांडुरंग नांगरे, बाळकू साळवी, लखू साळवी, पांडू साळवी, महादू साळवी, पांडू डांगे, गणपा जाधव, गणपा घोडे, बाळकू घोडे, यशवंत नांगरे, नारायण नांगरे, मधू साळवी हे प्रसिध्द मल्ल होते. ही परंपरा पुढे बाबूराव घोडे, यशवंत नायकवडी, भीमराव माने, महाराष्ट्र चॅम्पियन संजय माने, वसंत मोहिते, बाबासाहेब लोहार, बाजीराव सनगर, नथुराम घोडे, दिनकर करुंकलेकर, सर्जेराव नांगरे, अनिल लोखंडे, ज्ञानदेव घोडे, गणेश माने, मानसिंग साळवी, सागर घोडे यांनी चालू ठेवली आहे. पोलीस ठाण्यालगत असणाऱ्या या कुस्ती आखाड्याला शिवाजीराव देशमुख यांचे नाव दिले असून, त्यांनीच लाखो रुपयांचा निधी मिळवून दिला आहे. (वार्ताहर)मैदानासाठी मदतनिनाईदेवी यात्रेनिमित्त होणारे कुस्ती मैदान तसेच सर्वच कार्यासाठी गावकऱ्यांना माझे सहकार्य असणार आहे. यासाठी लागणारा निधी शासनाकडून मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही मत विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी व्यक्त केले.निनाईदेवीची फकीर अलिशाबाबांचा उरुस उत्साहात साजरा होत आहे. या आनंदोत्सवामध्ये सर्वधर्मीयांनी व राजकीय गटा-तटांनी सक्रिय सहभागी व्हावे.- शिवाजीराव घोडे-पाटील, संचालक, विश्वास साखर कारखानानिनाईदेवीची फकीर अलिशाबाबांचा उरुस उत्साहात साजरा होत आहे. या आनंदोत्सवामध्ये सर्वधर्मीयांनी व राजकीय गटा-तटांनी सक्रिय सहभागी व्हावे.- शिवाजीराव घोडे-पाटील, संचालक, विश्वास साखर कारखाना
कोकरुडच्या मैदानाचे काम अंतिम टप्प्यात
By admin | Published: December 04, 2014 10:05 PM