शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
2
"भरोसा दिल से, भाजपा फिर से..."; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
3
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
4
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
5
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
6
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
7
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
8
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर
9
काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...
10
बांगलादेशमध्ये सरकारकडून दूर्गा पूजेवर बंदी, मंडळांना जिझिया कर देण्याचे आदेश, काही ठिकाणी मूर्ती तोडल्या
11
भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल
12
वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!
13
मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
14
Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री
15
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
16
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
17
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
18
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
19
Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी
20
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती

Lata Mangeshkar: सुख-दु:खाच्या हिंदोळ्यावरचे सांगलीतील लतादीदींचे बालपण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 11:15 AM

प्रचंड उलथापालथ अनुभवत अगदी लहान वयातच लता मंगेशकरांना सांगलीचा निरोप घ्यावा लागला होता.

अविनाश कोळीसांगली : नाटकांचे संवाद, नाट्यगीतांचा बहर, शास्त्रीय संगीताच्या मैफीली, नाटकमंडळींची वर्दळ आणि सुवर्णकाळातून बरसलेली सधनता अनुभवत लतादिदींचे सांगलीतील बालपण बहरले. समृद्धीच्या पाऊलवाटांवरून चालताना वेदनांच्या काटेरी प्रवासाने घायाळ होण्याचा अनुभवही याच सांगलीत आला. सुख-दु:खाच्या हिंदोळ्यावरचे हे बालपण अशा वेगवेगळ्या अनुभवांनी त्यांच्या मनात खोलवर कोरले गेले ते कायमचेच.सांगलीच्या एसटी स्टँडपासून हाकेच्या अंतरावर कोटणीस महाराजांच्या मठासमोरील चौकातच मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी प्रशस्त घर घेतले होते. या घराला तेरा खोल्या होत्या. मंगेशकर कुटुंबिय वरच्या मजल्यावर आणि तळमजल्यावर त्यांचे गणुमामा म्हणजे मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते रहायचे. याच घरामध्ये प्रतिष्ठित, विद्वान व गुणवंत मंडळींची कलाकारांची सतत ऊठबस असत. याच घरात लतादिदींसह आशा, उषा, मीना, हृदयनाथ या भावंडांचे बालपण गेले. 

लतादिदींचा जन्म इंदौर येथे झाला असला तरी मास्टर दीनानाथांबरोबर मंगेशकर कुटुंबिय सांगलीत आले आणि स्थिरावले. याच ठिकाणी लता मंगेशकरांवर संगीत व नाट्य संस्कार झाले. शास्त्रीय संगीत आत्मसात करीत असताना अभिनयाच्या प्रांतामधूनही लतादिदींनी फेरफटका मारला तो सांगलीतूनच. याचठिकाणी घरात त्यांनी अनेक नाटकांचे खेळ म्हणून सराव केले आणि परिणामी त्यांना नाटकात अभिनयाची संधीही मिळाली.१९३५ ते १९४0 हा त्यांचा सांगलीतील काळ संमिश्र अनुभवांचा राहिला. सांगलीतील शेवटचे हालाखीचे दिवस लता मंगेशकर यांना सर्वात वेदना देणारे होते. शेवटपर्यंत त्यांना या घटना सतावत राहिल्या. प्रचंड उलथापालथ अनुभवत अगदी लहान वयातच लता मंगेशकरांना सांगलीचा निरोप घ्यावा लागला होता. 

टॅग्स :SangliसांगलीLata Mangeshkarलता मंगेशकर