शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
3
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
4
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसे मिळवायचं
5
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
6
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
7
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
9
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
10
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
11
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
12
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
13
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
14
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
15
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
16
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
17
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
19
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

सांगलीत बाजार समितीत नव्या हळद सौद्यांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 10:30 AM

Agriculture Sector market sangli- कृषि उत्पन्न बाजार समितीत नविन हळद सौदयांचा शुभारंभ सभापती दिनकर पाटील यांच्याहस्ते सोमवारी सकाळी झाला. गणपती जिल्हा कृषि अ‍ौद्योगिक सोसायटीत हा कार्यक्रम झाला. बावची (ता. वाळवा ) येथील हळद उत्पादक शेतकरी सतीश विष्णू कोकाटे यांच्या राजापूरी हळदीला ११२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

ठळक मुद्देसांगलीत बाजार समितीत नव्या हळद सौद्यांचा शुभारंभ राजापूरी हळदीला ११२०० रुपये प्रतिक्विंटल दर

सांगली : कृषि उत्पन्न बाजार समितीत नविन हळद सौदयांचा शुभारंभ सभापती दिनकर पाटील यांच्याहस्ते सोमवारी सकाळी झाला. गणपती जिल्हा कृषि अ‍ौद्योगिक सोसायटीत हा कार्यक्रम झाला. बावची (ता. वाळवा ) येथील हळद उत्पादक शेतकरी सतीश विष्णू कोकाटे यांच्या राजापूरी हळदीला ११२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.हळद सौद्यामध्ये कमीत कमी ५०००) व जास्तीजास्त ११२०० इतका दर पहिल्या दिवशी मिळाला. सौदयाच्या शुभारंभप्रसंगी व्यापारी प्रतिनिधी संचालक शीतल पाटील, मुजीर जांभळीकर, हमाल प्रातिनिधी बाळासाहेब बंडगर, संचालक जीवन पाटील, अडत व्यापारी मनोहर सारडा, गोपाळ मर्दा, माजी महापौर सुरेश पाटील, सत्यनारायण अटल, मधूकर काबरा, राजेंद्र मेणकर, हमाल पंचायतीचे सचिव विकास मगदूम बाजार समितीचे प्रभारी सचिव आर. ए. पाटील, हळद सोदे विभाग प्रमुख एम. के. रजपूत यांच्यासह अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार व शेतकरी उपस्थित होते.सभापती पाटील यांनी आवाहन केले की, नव्या हंगामात हळदीला चांगला दर मिळू लागला आहे. सांगलीच्या हळदीची गुणवत्ता चांगली असल्याने जगभरातून मागणी आहे. त्यामुळे शेतकर्यांनी जास्तीजास्त हळद विक्रीसाठी आणावी. विविध बँकांतर्फेहळद व बेदाणा शेतमाल तारण कर्ज योजना सुरु आहे, तिचाही लाभ घ्यावा.

टॅग्स :MarketबाजारSangliसांगली