कामेरी : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कामेरी (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एकचे यू-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर संविधानाची प्रास्ताविका शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी धनाजी माने यांच्या ‘मी शाळा बोलतेय!’ या कामेरी जिल्हा परिषद शाळेचे आत्मवृत्त लेखाचे प्रकाशन करण्यात आले. प्रभारी केंद्रप्रमुख सिंधूताई पाटील, मुख्याध्यापक सुनीता आष्टेकर, शोभा माने, जयश्री कुंभार, सुनील जगताप आदी उपस्थित होते.
फोटो-२७कामेरी१
फोटो ओळी : कामेरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या यू-ट्यूब चॅनलचे उद्घाटन सचिन जाधव यांनी केले. यावेळी धनाजी माने, सुमित्रा पाटील, सिंधूताई पाटील, सुनीता आष्टेकर, शोभा माने, जयश्री कुंभार, सुनील जगताप उपस्थित होते.