शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

नेत्यांकडून बंडखोरांच्या विनवण्या सुरू...

By admin | Published: September 29, 2014 12:27 AM

विधानसभा निवडणूक : महत्त्वाचे बंडखोर ठरणार डोकेदुखी, स्थानिक व राज्यस्तरीय नेत्यांकडून प्रयत्न

सांगली : आठ विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय याद्या तयार झाल्यानंतर आता प्रत्येक पक्षातील नेत्यांना बंडखोरांची चिंता सतावत आहे. डोकेदुखी ठरू पाहणाऱ्या बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून स्थानिक नेत्यांसह राज्यस्तरीय नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू झाली आहे. भविष्यात दुसरी संधी देण्याची आश्वासने आता बंडखोरांना मिळू लागली आहेत. सांगली जिल्ह्यात सध्या बंडखोरांचे पीक आले आहे. कोणताही पक्ष याला अपवाद राहिलेला नाही. महायुती आणि आघाडी तुटल्यानंतर बंडखोरांची संख्या कमी झाली असली तरी, ती संपुष्टात आलेली नाही. अधिकृत उमेदवाराला डोकेदुखी ठरू पाहणाऱ्या मोठ्या बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी आता पक्षीय पातळीवर पळापळ सुरू झाली आहे. अधिकृत उमेदवारालाही यासाठी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आता बंडखोरांचे पीक आले आहे. यातील सर्वच बंडखोर दखलपात्र नाहीत. मोजक्याच बंडखोरांसाठी आता पक्षीय पातळीवरून मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सांगलीत दिनकर पाटील, शिवाजी डोंगरे, मिरजेतून सी. आर. सांगलीकर, इस्लामपुरातून बी. जी. पाटील, पलूस-कडेगावमधून संदीप राजोबा यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर तासगाव-कवठेमहांकाळमधील शिवसेनेचे दिनकर पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. बंडखोर व नाराज इच्छुकांना आता शांत करण्याची गरज जिल्ह्यातील प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटू लागली आहे. त्यातूनच मनधरणीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. अधिकृत उमेदवारांना याचा सर्वाधिक त्रास होणार असल्याने अशा उमेदवारांनी बंडखोरांना शांत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. काँग्रेसमधील नाराजांची समजूत काढण्यासाठी प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. दूरध्वनीवरून बंडखोर व नाराजांशी संवाद साधला जात आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे आणि अन्य नेत्यांनी बंडखोरांशी चर्चा सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १ आॅक्टोबरपर्यंत आहे. मनधरणीसाठी नेते, पदाधिकारी आणि उमेदवारांकडे केवळ तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. इतक्या कमी कालावधित अशा लोकांना शांत करणे कसरतीचे ठरणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह, भाजप, सेनेलाही या गोष्टी कराव्या लागत आहेत. (प्रतिनिधी)देवा! छाननीत अर्ज उडव!उमेदवारी अर्जांची उद्या (सोमवारी) छाननी होणार आहे. बऱ्याचजणांना आपला अर्ज बाद तर होणार नाही ना, याबद्दल चिंता लागली आहे, तर अनेकांनी स्पर्धक उमेदवारांचा अर्ज बाद व्हावा म्हणून देवाला साकडे घातले आहे. बहुतांश पक्षांनी अधिकृत उमेदवाराला पर्याय म्हणून आणखी काहींचे अर्ज दाखल केले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद होवो, असे देवाला साकडे घातले आहे. सांगलीतील अशाच एका दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराने अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर मलाच संधी मिळेल, अशी खात्री व्यक्त केली. ४आर. आर. पाटील यांच्यावर टीका करून यापूर्वीच खासदार संजय पाटील, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यात आता आणखी काही लोकांची भर पडण्याची चिन्हे आहेत. सांगलीत उमेदवारीसाठी प्रमुख दावेदारांपैकी एक असलेले दिनकर पाटील यांचे नाव जेव्हा चर्चेत आले, तेव्हा आर. आर. यांनी त्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकारच नाही, असे स्पष्ट केले. संजय पाटील यांचा उघडपणे प्रचार केल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागितलीच कशी, असा सवाल आबांनी उपस्थित केल्याची चर्चा आता राष्ट्रवादीच्या गोटात रंगली आहे. यापूर्वी अनेक बैठकांमधूनही आर. आर. पाटील यांनी दिनकर पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. दिनकर पाटील यांच्यासह समर्थकांमध्ये या गोष्टीवरून नाराजी दिसत आहे.