जत रोड हे जत तालुक्यातील एकमेव स्टेशन आहे. जतबरोबरच त्याचा उपयोग आटपाडी तालुक्याला होणार आहे. या ठिकाणाहून व्यापारी, सैन्यदलातील सैनिक यांना मिरज किंवा सोलापूर या ठिकाणी जावे लागते. तसेच आटपाडी व जत तालुक्यातील अनेक गलाई व्यावसायिक देशातील वेगवेगळ्या शहरांत व्यापार करीत आहेत. यामुळे कोल्हापूर-नागपूर, पंढरपूर-बंगळुरू आदी अतिजलद गाड्यांना जत रोड स्टेशन थांबा देण्यात यावा, त्याचबरोबर महालक्ष्मी किंवा कोयना एक्स्प्रेस जत रोड स्टेशनवरून सोडण्यात याव्यात. यामुळे हजारो नोकर, कामगारांची सोय होणार आहे. याचा फायदा आटपाडी व जत तालुक्याला होणार आहे.
पंढरपूर-मिरज पॅसेंजर दररोज सुरू करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असून सांगोला, जत, आटपाडी या तालुक्यातील औद्योगिक कामगार, शेतकरी, व्यापारी यांची सोय होणार आहे. म्हणून दररोज सकाळी ६ ते ७ दरम्यान पंढरपूर-मिरज व संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान मिरज-पंढरपूर रेल्वे सुरू करावी, अशा सूचना जमदाडे यांनी मांडल्या आहेत.
080721\img_20200330_192042.jpg
महालक्ष्मी किंवा कोयना एक्सप्रेस जतरोड स्टेशन वरून सोडण्यात येण्यासाठी प्रयत्न करणार : प्रकाश जमदाडे