वाळवा : जुनेखेड (ता. वाळवा) येथे अरुणभैय्या नायकवडी स्मृती १६ व्या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याची माहिती अरुणभैय्या नायकवडी पतसंस्थेचे अध्यक्ष व हुतात्मा दूध संघाचे संचालक बाळासाहेब पाटील यांनी वाळवा येथे दिली.
ते म्हणाले, हुतात्मा संकुलाचे कुशल मार्गदर्शक व हुतात्मा बँकेचे संस्थापक-अध्यक्ष आणि पंचायत समितीचे अभ्यासू सदस्य अरुणभैय्या नायकवडी यांनी जी देदीप्यमान कामगिरी केली आहे, ती आजही नव्या पिढीच्या लक्षात आहे. ती ज्ञात होण्यासाठीच या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ साहित्यिक रवी राजमाने ‘मी व माझ्या कथा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. २३ फेब्रुवारीस प्रा. डाॅ. उल्हास माळकर हे ‘असे होते शंभुराजे’ या विषयावर, तर २४ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ साहित्यिक आप्पासाहेब खोत हे ‘व्यथा माणसांच्या कथाकथनाच्या’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. याचा श्रोत्यांनी लाभ घ्यावा. व्याख्यानमाला जुनेखेड मराठी शाळेत दररोज रात्री साडेसात वाजता होईल.