शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

खबरदारी घ्या! चार महिने बिबट्यांचा प्रजनन काळ; ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांनी जागरूक राहणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 5:54 PM

बिबट्यांचे याच काळात हल्ले

विकास शहाशिराळा : जंगलामध्ये वन्य प्राण्यांना पुरेसे खाद्य उपलब्ध नाही. त्यातच वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरकाव करत आहेत. चांदाेली परिसरातून बाहेर पडलेल्या बिबट्यांसह अन्य वन्य प्राण्यांचा वावर ऊस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा कृष्णा-वारणाकाठी धोका वाढला आहे. पुढील तीन-चार महिने बिबट्यांचा प्रजनन काळ असल्याने धाेका वाढला आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार, नागरिक, शेतकऱ्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.मादी बिबट पिलांना जन्म देण्यासाठी ऊस पट्ट्याला सुरक्षित मानत आहे, त्यासाठी ती जंगलातून बाहेर पडते. यामुळे आता माणसानेच सावध राहण्याची वेळ आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा तीन महिन्यांचा बिबट्यांचा प्रजनन काळ आहे. त्यांना आपल्या बछड्यांची सुरक्षितता जंगलापेक्षा उसात अधिक वाटते. जंगलात बछड्यांना तरसापासून अधिक धोका असतो. त्यामुळे बिबटे बछड्यांना उसात सुरक्षित ठेवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. उसात राहून त्यांना गावठी कुत्री, कोल्हे, ससे, घुशी असे भक्ष्य सहज उपलब्ध होते. यामुळे बिबटे उसातच मुक्काम ठाेकतात. सध्या ऊस तोडणी सुरू असल्याने शेतकरी व ऊसतोड मजुरांनी आपल्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सतर्क राहायला हवे.शिराळा, शाहूवाडी तालुक्यात अनेक गावांत बिबट्याचे दर्शन होत आहे. पाळीव प्राण्यांवर व माणसांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचे हल्ले थांबवण्यासाठी दीर्घकालीन उपाय आवश्यक आहेत. त्यावर मंथन होतेय, मात्र पुढील तीन महिने महत्त्वाचे आहेत. विशेषतः वारणा, कृष्णा नदीकाठच्या ऊस पट्ट्यातील नागरिकांनी डोळ्यांत तेल घालून राहण्याची गरज आहे.

बिबट्यांचे याच काळात हल्लेचांदोली अभयारण्यालगत असणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर वारुणपैकी तळीचा धनगरवाडा येथे आठवर्षीय मुलीचा मृत्यू झाला. गतवर्षी केदारलिंगवाडी येथील दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, उखळू येथील नऊ वर्षांच्या मुलावरील हल्ल्याच्या घटना ऑक्टोबर ते डिसेंबर याच काळात घडल्या आहेत. याशिवाय शिराळा तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या मुलांवरही हल्ले झाले. त्यात एकाचा जीव गेला.

अभयारण्यालगत गावात वावरणारे बिबटे जंगली असल्याने भक्ष्य पकडण्यासाठी ते अधिक आक्रमक असतात. त्या प्रमाणात ऊस क्षेत्रातील बिबट्या आक्रमक नसतो. कारण गावातील मोकाट कुत्री, जनावरे, मोर, वानरे, डुक्कर अशा प्राण्यांवर तो गुजराण करतो. गावकऱ्यांनी सावध राहावे, लहान मुलांना एकटे सोडू नये. - अजितकुमार पाटील, मानद वन्यजीव रक्षक.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्याforest departmentवनविभागFarmerशेतकरी