शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

शेतात मृतावस्थेत आढळला बिबट्या, गावकऱ्यांसह वन अधिकाऱ्यांची धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 4:27 PM

या बिबट्याचा पंचनामा करुन त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी वनविभागाच्या व्हॅनमधून मृत बिबट्यास इस्लामपूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले आहे

सांगली - रेठरे धरण ता. वाळवा येथील ओझर्डे शिव या नावाने परिचित असलेल्या संपत जाधव यांच्या शेतात शाळूपिकाच्या मृतावस्थेत बिबट्या आढळून आला आहे. दोन वर्षें वयाच्या नर जातीच्या बिबट्याचा दुसऱ्या बिबट्याच्या झटापटीत मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समजले असून हा मृत बिबट्या शेतकऱ्यांना आढळून आला. घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन या बिबट्याचा पंचनामा केला आहे. 

रेठरे धरण गावच्या पश्चिमेला दीड किलोमीटर अंतरावरील ओझर्डे रेठरे धरण हद्दीवरील संपत जगन्नाथ जाधव यांच्या गट क्रमांक ४६३ या शाळू असलेल्या शेतात व विजय आनंदा नांगरे पाटील यांच्या शेताच्या हद्दीवरील बांधावर बिबट्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. या नर बिबट्याचा शनिवारी रात्रीवेळी मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रविवारी सकाळी बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समजताच घटनास्थळी रेठरे धरण येथील नागरिकांनी गर्दी केली होती. घटनास्थळी माहिती घेण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक डॉ अजित साजने यांनी भेट देऊन या बिबट्याच्या शरीरावरील काही जखमा आहेत का याची पाहणी केली. या बिबट्याचा पंचनामा करुन त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी वनविभागाच्या व्हॅनमधून मृत बिबट्यास इस्लामपूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले आहे    या नर बिबट्याच्या मृत्यूचा शोध घेण्यासाठी श्वानास पाचारण करण्यात येणार आहे. यावेळी वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक रायना पाटोळे, वनरक्षक अमोल साठे, सहाय्यक वनरक्षक शहाजी खंडागळे, वनमजुर अनिल पाटील, पांडुरंग उगळे, सचिन कदम उपस्थित होते. यावेळी रेठरे धरण येथील उद्योजक दादासो पाटील, हर्षवर्धन पाटील, माजी सरपंच सुदाम पाटील,सुहास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

वनपाल यांनी वर्तवला अंदाज

नर बिबट्याचा मृत्यू एखादा बिबट्या अथवा तरस सारख्या प्राण्याच्या हल्ल्यात किंवा झटापटीत झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वनपाल सुरेश चरापले यांनी या बिबट्याच्या मृत्युबाबत सांगितले की, याच्या शवविच्छेदनमध्ये बिबट्याच्या शरीरावर काही जखमा (छिद्रे)आढळून आल्या. त्या दुसऱ्या बिबट्याने केलेल्या झटापटीत झालेल्या असण्याचा अंदाज असून, नर बिबटे हे दोघे एकत्र राहू शकत नाहीत, ते एकमेकांच्या हद्दीत दुसऱ्यास येऊ देत नाहीत, अशावेळी त्यांच्यात झटपट होण्याच्या घटना घडतात. या मृत झालेल्या बिबट्याचे किडनी, लिव्हर, (व्हिसेरा) तपासणीसाठी नागपूर अथवा अन्य ठिकाणी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून नंतर आणखी माहिती मिळू शकते. 

दरम्यान, सदर घटनास्थळापासून शंभर ते दीडशे फुटावर एक कोल्हा चार ते पाच दिवसापूर्वी मरुन पडल्याचे वनअधिकाऱ्यांना दिसून आले आहे. येथील कामेरकर मळा परिसरात पहाटे प्रदीप राजाराम पाटील यांनी पाळलेले त्यांचे कुत्रेदेखील बिबट्याने झडप घालून पळवून नेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हा बिबट्या हा होता की दुसरा याबाबत साशंकता आहे. 

टॅग्स :leopardबिबट्याSangliसांगलीforest departmentवनविभाग