शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सहकारमंत्र्यांना ‘सळो की पळो’ करू : शेट्टी

By admin | Published: April 18, 2016 11:53 PM

शेतकरी मेळावा : एफआरपीसाठी १ मेनंतर ‘आर या पार’ची लढाई

सांगली : एफआरपीची उर्वरित २० टक्के रक्कम देण्याबरोबरच जादा दराची रक्कमही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. येत्या ३० एप्रिलपर्यंत यावर निर्णय झाला नाही, तर कायदा हातात घेतला जाईल. याप्रश्नी सहकारमंत्र्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथील शेतकरी मेळाव्यात दिला. येथील विष्णुअण्णा फळ मार्केट परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा पार पडला. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांना एफआरपीची उर्वरित रक्कम तातडीने मिळाली पाहिजे. त्याशिवाय साखरेला जादा भाव मिळाल्याने त्याचाही मोबदला शेतकऱ्यांच्या पदरात पडला पाहिजे. साखर कारखानदार याप्रश्नी टाळाटाळ करीत आहेत. ३० एप्रिलपर्यंत पैसे मिळाले पाहिजेत. कारखानदार जर दाद देत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करा. कारखानदारांना शेतकऱ्यांचे पैसे देणे जमत नसेल, तर त्यांच्या वाट्याची साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना द्यावी. आम्ही ती बाजारात विकून आमचे पैसे काढून घेऊ. सहकार विभागाने नियमानुसार कारवाई न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनाच कायदा हातात घेईल. शेतकऱ्यांच्या उर्वरित बिलातून निर्यातीसाठी दिलेल्या नुकसानभरपाईची रक्कम कपात करण्याचा डाव काही साखर कारखानदारांनी आखला आहे. त्यांना याचा कोणताही अधिकार नाही. असे कृत्य कोणी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी लढा देऊ. पुढील हंगामावेळी साखरेचे भाव अधिक असले, तर एफआरपी न मागता आम्ही पहिली उचल मागू. साखरेचे दर कमी असतील त्याचवेळी एफआरपीची केली जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही संघटना जन्माला आल्याने संघर्षावेळी सरकार कोणाचे आहे, हे आम्ही पाहणार नाही. येत्या १ मेपासून कारखानदार व शासनाच्याविरोधात निर्णायक लढाई सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. सहकारी बॅँकांमधील घोटाळा प्रकरणात अडकलेल्या नेत्यांबद्दल ते म्हणाले की, सहकार कायद्यातील नियमानुसार पाच वर्षांपूर्वीचा घोटाळा माफ केला जात असेल, तर पाच वर्षापूर्वी चोरी करणाऱ्या संशयितांनाही सोडून देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. अशाप्रकारच्या कायद्यातील पळवाटा बंद करून घोटाळेबहादरांवर कारवाईचे धाडस सहकारमंत्र्यांनी दाखवावे. मेळाव्यास संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, प्रवक्ते महेश खराडे, बाजार समितीचे सभापती संतोष पाटील, संभाजी मेंढे, प्रकाश वलवडकर, सागर खोत, भगवान काटे, संदीप राजोबा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)एकही लाल दिवा सुरक्षित राहणार नाही!राज्य शासन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सदाभाऊ मध्यस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी सहकारमंत्र्यांना समजावून सांगावे. येत्या ३० एप्रिलपर्यंत शासनाने उर्वरित रकमेच्या प्रश्नात लक्ष घातले नाही, तर सांगली, कोल्हापुरात एकही लाल दिवा सुरक्षित राहणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.मुश्रीफ यांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करागेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले मुश्रीफ-शेट्टी वाक्युद्ध मेळाव्याच्या निमित्ताने कायम राहिले. वारंवार माझ्या तपासणीची मागणी करणाऱ्या आ. हसन मुश्रीफ यांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी व्हावी, माझेही कॉल तपासावेत. तपासणीत परदेशात कोणाचा संवाद होतो, कोणाचे काळे-बेरे आहे, आरोपी कोण आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे समोर येतील, असे शेट्टी म्हणाले. कारवाई करा, रेडे बोलतील...पुराणात रेड्याने वेद म्हटल्याची कथा आहे. या कथेप्रमाणे रेडे बोलावेत असे वाटत असेल, तर सहकारमंत्र्यांनी त्यांचे कारवाईचे कर्तव्य पार पाडावे. साखर उत्पादित होण्यापूर्वी तिची विक्री कशी झाली?, कवडीमोल दराने कारखाने कसे विकले गेले?, या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना व राज्यातील जनतेला मिळतील, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली. गोपनीय संदेश मिळेल !आंदोलनाबाबत येत्या २७ किंवा २८ एप्रिल रोजी शेतकऱ्यांना गोपनीयरित्या संदेश दिला जाईल. त्यानंतर संदेशाप्रमाणे आंदोलनासाठी त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले. मंत्रीही दरोडेखोरांना सामील?आम्ही राज्यातील सहकारी साखर कारखानदारीतील काळ्या पैशाच्या गुंतवणुकीबद्दल ओरड करत असतानाही, विद्यमान सरकार काहीही करीत नाही. त्यामुळे पांढऱ्या कपड्यातील या दरोडेखोरांना सध्याचे मंत्रीही सामील झाले आहेत की काय?, अशी शंका येत आहे. सांगलीच्या बाजार समितीमधील एका भ्रष्ट कर्मचाऱ्याला ४२ लाखांच्या अपहारप्रकरणी बडतर्फ करण्यात आल्यानंतर, सहकारमंत्री त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी शिफारस करीत आहेत. या गोष्टीवरून जनतेने काय समजायचे?, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.