शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

संघर्षाच्या तयारीनेच विधानसभा मैदानात उतरू: जयश्रीताई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:58 PM

सांगली : मदनभाऊ पाटील यांचे नेतृत्व संघर्षातून उभे राहिले होते. अनेक पराभव त्यांनी पचविले होते. संघर्षातून जे मिळते, तेच ...

सांगली : मदनभाऊ पाटील यांचे नेतृत्व संघर्षातून उभे राहिले होते. अनेक पराभव त्यांनी पचविले होते. संघर्षातून जे मिळते, तेच अधिक काळ टिकते. माझ्यावर कितीही संकटे येऊ द्यात, मी डगमगणार नाही. संघर्षाची तयारी ठेवून शेवटच्या श्वासापर्यंत कार्यकर्त्यांसोबत राहीन, अशी ग्वाही देत, सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांनी रविवारी स्पष्ट केले.लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विष्णुअण्णा भवन येथे मदनभाऊ गटाचा मेळावा झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. पाटील म्हणाल्या की, सांगली मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते, तुम्ही काय करणार?, अशी विचारणा करीत होते. मदनभाऊंवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतली आहे. मदनभाऊंप्रमाणेच मीही शेवटच्या श्वासापर्यंत कार्यकर्त्यांसोबत राहणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भाऊंसारखेच स्वाभिमानी राहावे. लोकशाहीत सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मीही विधानसभेसाठी उमेदवारी मागणार आहे. काँग्रेस पक्षाकडून त्याचा निश्चित विचार होईल.सध्या देशातील परिस्थिती बदलली आहे. सर्वच घटक भाजपवर नाराज आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही रस्त्यावर उतरले पाहिजे. लवकरच लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. कुणी कितीही वावड्या उठवू दे, सर्वांनी पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे. जिल्ह्यात पक्षातील ज्येष्ठ नेते आता नाहीत. त्यामुळे वसंतदादांचा, काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.माजी महापौर किशोर जामदार म्हणाले, हा मेळावा काँग्रेसमधील कोणत्याही इच्छुक उमेदवाराच्या विरोधात नाही. मदन पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा जयश्रीतार्इंना उमेदवारी मागण्यासाठी हा मेळावा आहे. त्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न करावे लागणार आहेत. मदनभाऊंच्यावेळी कुणामुळे पराभव झाला, कुणी उमेदवार उभे केले, हे साºयांनाच माहीत आहे. पण या चुका दुरूस्त करून पुढे जावे लागणार आहे. जिल्ह्यातील पाडापाडीचे राजकारणही बंद झाले पाहिजे.यावेळी बुधगावचे अनिल डुबल म्हणाले, मदनभाऊंनी लढविलेल्या निवडणुकांचा निकाल पाहता, त्यांना मिळणारी मते पक्की आहेत. विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. सर्वांनी जयश्रीतार्इंना निवडून आणण्याची शपथ घ्यावी.डॉ. नामदेव कस्तुरे म्हणाले की, मदनभाऊ गटाइतके कार्यकर्ते कुठल्याच इच्छुकांकडे नाहीत. त्यामुळे जयश्रीतार्इंचाच पक्षश्रेष्ठींनी विचार करावा. करीम मेस्त्री म्हणाले, मदनभाऊंना काहींनी धोका दिला होता. पण जयश्रीतार्इंच्याबाबतीत हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.अजित सूर्यवंशी म्हणाले की, मदनभाऊंचा पराभव झाला तरी, आम्ही खचलो नाही. २००४ प्रमाणे यंदाही काँग्रेसचा गड सर करू.प्रा. शिकंदर जमादार, रत्नाकर नांगरे, हारुण शिकलगार, सुभाष खोत, नरसगोंडा पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची यावेळी भाषणे झाली.तिघांमधील भांडणे मिटवा : नायकवडीनगरसेविका वहिदा नायकवडी म्हणाल्या की, मदन पाटील यांच्यामुळेच आमचा काँग्रेस प्रवेश झाला होता. ते आमचे नेते होते. त्यांच्याशी काही मुद्द्यावर पटले नाही, म्हणून ते आमचे नेते नव्हते, असे नाही. वसंतदादा घराण्यातच लोकसभा आणि विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी आमची मागणी आहे. प्रतीक, विशाल पाटील यांच्याशी तुमचे काय भांडण आहे, माहीत नाही. मदनभाऊ त्या दोघांनाही लहान भावाप्रमाणे मानत होते. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्हीच पुढाकार घ्या. तुमच्या तिघातील भांडण मिटवावे. त्यासाठी विजय वाड्यावर बसा किंवा साई वाड्यावर बसा, पण वाद मिटवून केवळ आम्हाला आदेश द्या, असे आवाहन त्यांनी केले.