कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील कोरोनाबधितांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी एकविचाराने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले.
कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाबाबत बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या सदस्या सुरेखा जाधव अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी कोरे यांनी ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या ९० टक्के लोकांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कामेरीत रुग्णसंख्या जास्त असली तरी मृत्युदर २.१ टक्के असल्याने भीतीचे कारण नाही. सर्वांनी गाव कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले.
यावेळी बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, सदस्य संजीव पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे, डॉ. किरण माने, साहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, नंदकुमार कोरे उपस्थित होते.