शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

जतमधून कदम काँग्रेस हद्दपार करू

By admin | Published: April 05, 2017 11:29 PM

सुरेश शिंदे : वाळेखिंडीत वसंतदादा विकास आघाडीच्या सदस्यांचा सत्कार

शेगाव : वसंतदादांच्या सांगली जिल्ह्यात कदम बंधूंनी कॉँग्रेसची वाट लावली. पतंगराव कदम पालकमंत्री असताना जत तालुक्याचे विभाजन केले नाही. केवळ पै-पाहुणे, नात्या-गोत्याचे राजकारण करून फक्त कदम कॉँग्रेस वाढवली. कॉँग्रेसला कायमचे हद्दपार करण्यासाठी आगामी जत नगरपरिषदेत भाजपबरोबर युती करून सत्ता आणू, असा इशारा वसंतदादा विकास आघाडीचे नेते सुरेश शिंदे यांनी दिला.वाळेखिंडी (ता. जत) येथे भाजप, वसंतदादा विकास आघाडीच्या नूतन सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे बोलत होते. सभापती मंगल जमदाडे, उपसभापती शिवाजी शिंदे, नूतन सरपंच भाऊसाहेब शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिंदे म्हणाले, जत तालुक्यात भाजपने वसंतदादा विकास आघाडी, जनसुराज्यबरोबर युती केली असती, तर तालुक्यातून कदम कॉँग्रेस हद्दपार झाली असती. जत पंचायत समितीमध्ये पाठिंबा देण्यासाठी आमच्यावर मुंबईवरून दबाव आला. परंतु आम्ही भाजपलाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आ. विलासराव जगताप यांनी आम्हाला उपसभापतीपद दिले. अगदी शेवटच्याक्षणी लाचार कॉँग्रेसने जगताप यांच्याकडे मुलगा मनोज जगतापला उपसभापती करण्यासाठी विनाअट पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु जगताप यांनी, आता विषय संपला असून, निर्णय झाल्याचे सांगितले. माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत म्हणाले, जतमध्ये कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नूतन सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात बेफाम दगडफेक करून गुंडगिरीचे दर्शन घडविले. जत शहरातील रस्त्यांच्या कामात गुंडगिरी सुरू आहे. कामे अडविली जात आहेत. प्रत्येक कामात अडथळा आणण्याचा उद्योग कॉँग्रेसकडून सुरू आहे. जत शहरात गुंडगिरीला कोण साथ देत आहे, हे जनतेने ओळखले आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, अ‍ॅड. प्रभाकर जाधव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव ताड, माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मनोज जगताप, जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता जाधव, सदस्या मंगल नामद, लक्ष्मी माळी, सुशिला तावशी, रामगौडा जिवण्णावर, प्रमोद सावंत उपस्थित होते. विलास शिंदे यांनी स्वागत केले. यू. डी. शिंदे यांनी आभार मानले. (वार्ताहर)सुरेश शिंदे यांनी भाजपच्या गाडीत बसावेडॉ. रवींद्र आरळी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली होती. जत तालुकाही कॉँग्रेसमुक्त करण्यासाठी सुरेश शिंदे यांनी आता कोणाचीही वाट न पाहता भाजपच्या गाडीत बसावे. यासाठी सर्व ते सहकार्य करण्यात येईल.