शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

जतला आता आठवड्यातून दोन दिवस पाणी

By admin | Published: April 24, 2016 11:07 PM

नगरपालिकेचा निर्णय : बिरनाळ तलावाने गाठला तळ; २५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध

जयवंत आदाटे -- जत --जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिरनाळ (ता. जत) येथील साठवण तलावात फक्त वीस दशलक्ष घनफूट इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नगरपालिकेने पाणी पुरवठ्यात कपात केली आहे. आठवड्यातून तीन दिवस होणारा पाणी पुरवठा बंद करून फक्त दोन दिवस पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना यापुढील काळात तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.जत शहराची लोकसंख्या सुमारे ३८ हजार इतकी आहे. गौसिद्ध साठवण तलाव, यल्लम्मादेवी विहीर व बिरनाळ साठवण तलाव येथून शहराला पाणी पुरवठा केला जात होता. त्यापैकी जानेवारी महिन्यातच गौसिद्ध तलाव कोरडा ठणठणीत झाला आहे, तर एक एप्रिलपासून यल्लम्मादेवी विहिरीतील पाणी उद्भव बंद झाला आहे. त्यामुळे याचा ताण बिरनाळ पाणी पुरवठा यंत्रणेवर पडू लागला आहे. बिरनाळ जलशुद्धीकरण केंद्रातून पाईपलाईनद्वारे यल्लम्मा विहिरीत पाणी नेऊन शहराच्या दक्षिण भागातील नागरिकांना सध्या पाणी पुरवठा केला जात आहे.बिरनाळ तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तलावातील मृतसंचय पाणी पातळी व गाळ याचा ताळमेळ घातला, तर फक्त पंचवीस-तीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा तलावात शिल्लक आहे. सध्या बिरनाळ तलावातून बारा हजार लिटर क्षमतेच्या टॅँकरद्वारे तालुक्यातील देवनाळ, मेंढेगिरी, बसर्गी, उमराणी, सिंदूर, बिळूर, खोजनवाडी, अचकनहळ्ळी, उंटवाडी, रेवनाळ, रावळगुुंडवाडी, बनाळी, अमृतवाडी आदी चौदा गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी वेगाने खाली जात आहे. कडक ऊन, अहोरात्र होणारा पाणी उपसा, बाष्पीभवन यामुळे येत्या पंधरा-वीस दिवसातच तलावातील पाणीसाठा संपुष्टात येईल, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.बिरनाळ तलावात म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या कालव्यामधून आलेले पाणी सोडण्यात येते. सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. पाटबंधारे विभागाने कुंभारी व शेगाव तलावात काही प्रमाणात पाणी सोडून तेथील पाणी पुरवठा बंद केला आहे. पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तलावात पाणी न सोडता शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या तलावात पाणी सोडल्यामुळे जत शहरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना, पाणी जवळ असूनही करावा लागत आहे. पाटबंधारे विभागाने बिरनाळ तलाव वगळून पुढे पाणी का सोडले आहे?. पिण्याच्या पाण्याचेही राजकारण केले जात आहे काय? याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरपरिषद विरोधी गटनेते परशुराम मोरे यांनी केली आहे. पाटबंधारे विभागाने बिरनाळ तलावात तात्काळ पाणी सोडणे आवश्यक आहे. जर पाणी सोडले नाही, तर नागरिक स्वत: आक्रमक होऊन पाण्याचे टॅँकर अडवतील अथवा म्हैसाळ कालवा फोडून पाणी स्वत: घेतील, असा इशारा जत नगरपरिषद नगराध्यक्ष इकबाल गवंडी व उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे. पाटबंधारे विभागाचा चुकीचा निर्णय तिप्पेहळ्ळी तलावात सध्या पाणी सोडले जात आहे. कुंभारी व तिप्पेहळ्ळी तलावादरम्यान बिरनाळ साठवण तलाव आहे. पाटबंधारे विभागाने चुकीचा निर्णय घेऊन, बिरनाळऐवजी तिप्पेहळ्ळी तलावात पाणी सोडले आहे. तिप्पेहळ्ळी तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही, फक्त शेतीसाठी वापरले जाते.