: २३ तासगाव०१ : तासगाव येथे आम्ही तासगावकर कोविड सेंटरचे उद्घाटन करताना राजेंद्र पाटील-यड्रावकर, नितीन बानगुडे-पाटील.
तासगाव : शासकीय निधीतून उभारलेल्या इमारतीला खासगी स्वरूप येणार नाही. शासनाचा खर्च झालेला पैसा गोरगरिबांसाठी उपयोगात आला पाहिजे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तासगावच्या कस्तुरबा रुग्णालयाचे खासगीकरण होणार नाही. येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी येथे दिली.
आम्ही तासगावकर कृती समितीच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या आम्ही तासगावकर मोफत कोविड केअर सेंटरचे लोकार्पण राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी नितीन-बानगुडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, तहसीलदार कल्पना ढवळे, विशाल पाटील उपस्थित होते.
ते म्हणाले की, कोविडच्या काळात पक्ष बाजूला ठेवून लोकांसाठी काम करण्याची ही वेळ आहे.
बानगुडे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रत्येकाने स्वतःच्या तब्येतीची जबाबदारी घेऊन समाजाचीही जबाबदारी घेण्याचे आवाहन केले.
संजय विभूते यांनी सेंटर सुरू असेपर्यंत लागणारे मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीट शिवसेनेच्या वतीने देण्याची घोषणा केली. शेकापचे अजित सूर्यवंशी यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मदत जाहीर केली.
तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी तासगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची तसेच कस्तुरबा हॉस्पिटल सरकारतर्फे चालविण्याची मागणी केली.
सावर्डेचे सरपंच प्रदीप माने यांनी स्वागत केले. संदेश भंडारे यांनी आम्ही तासगावकर संघटना व कोविड सेंटर सुरू करण्यामागील भूमिका स्पष्ट केली.
यावेळी आम्ही तासगावकर कृती समितीचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, संदीप गिड्डे, माणिक जाधव, कृष्णा पाटील, अरुण खरमाटे, साहेबराव पाटील, फारुख गवंडी, अर्जुन थोरात, पांडुरंग जाधव, संजय चव्हाण, डॉ. विवेक गुरव, अमोल कदम उपस्थित होते.