संजयनगर : सांगलीतील कर्नाळ रोड ते जुना पद्माळे रोड येथील अमोल चौगुले यांच्या घरी रविवारी घोणस जातीचा विषारी साप आढळून आला. सर्पमित्र अवधूत सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने त्या सापाला पकडले व सुरक्षितस्थळी सोडले. यामुळे या सापाला जीवदान मिळाले.
सांगलीतील जुना पद्माळे रोड येथील अमोल चौगुले यांच्या घरी रविवारी घोणस जातीचा विषारी साप आढळून आला. याबाबत नागरिकांनी सर्पमित्र अवधूत सावंत यांना माहिती दिल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तो साप चौगुले
यांच्या घरात घुसला होता. अर्धा ते पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर त्याला पकडले व सुरक्षितस्थळी सोडले. त्यांची लांबी ५ फूट होती. सर्पमित्र अवधूत सावंत हे गेली १२ वर्षांपासून साप धरत आहेत. आतापर्यंत त्यांनी ६ ते ७ हजार सापांना सुरक्षितस्थळी सोडले आहे.
चौकट -
सहकार्याचे आवाहन
सचिन साळुंखे, मंदार शिंपी, विशाल चव्हाण, गौरव हर्षद, इलियास शेख, इर्शाद बागवान हे सांगली शहरामध्ये विविध ठिकाणी साप, पक्षी तसेच इतर प्राणी पकडतात आणि त्यांना सुरक्षितपणे निसर्गाच्या सान्निध्यात सोडतात. याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाईल्ड लाईफ रेस्कुवर या ग्रुपने केले आहे.
फोटो-२१दुपटे०१