शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
2
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
3
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
5
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
6
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
7
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
8
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
9
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
10
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
11
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
12
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
13
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
14
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
15
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
16
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
17
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
18
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
19
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
20
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार

लावतो चुना, पण किंगमेकर म्हणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 8:16 PM

इस्लामपूरजवळचं हिरवंगार फार्महाऊस. उन्हाची काहिली होत असतानाही इथं सगळं गारीगार. हायवेपासून पार आत असलेल्या फार्महाऊसपर्यंत आलेल्या गुळगुळीत रस्त्यावरून झुळकन् नवीकोरी इनोव्हा क्रिस्टा येते. सदाभाऊ उतरून आस्ते कदम (हो! आंदोलनं बंद केल्यापासून तरातरा चालण्याची सवय मोडलीय!) आत जातात. पाठोपाठ महिंद्राची एक्सयूव्ही येते.

ठळक मुद्देसावकरांनी कागदाचा बोळा करून फेकून दिला!पहिलं पान उघडलं आणि थंडगार एसीतही सदाभाऊंना घाम फुटला.

- श्रीनिवास नागेइस्लामपूरजवळचं हिरवंगार फार्महाऊस. उन्हाची काहिली होत असतानाही इथं सगळं गारीगार. हायवेपासून पार आत असलेल्या फार्महाऊसपर्यंत आलेल्या गुळगुळीत रस्त्यावरून झुळकन् नवीकोरी इनोव्हा क्रिस्टा येते. सदाभाऊ उतरून आस्ते कदम (हो! आंदोलनं बंद केल्यापासून तरातरा चालण्याची सवय मोडलीय!) आत जातात. पाठोपाठ महिंद्राची एक्सयूव्ही येते. पोरगा सागरसोबत आणखी दोघं-तिघं. सगळे गुबगुबीत कोचवर विसावतात. एसी सुरू होतो.

सदाभाऊ हळूच टीपॉयवरच्या बाऊलमधला बदाम तोंडात टाकतात. चेहरा वैतागलेला. ‘आरं, त्या चंद्रकांतदादाला सांगा रे... हातकणंगलेची सीट मीच निवडून आणल्या म्हणूनशान फकस्त एकदा सगळ्यांम्होरं सांग म्हणावं. फकस्त एकदाच या सदाला क्रेडिट दे म्हणावं...’, सदाभाऊ बोलले. सगळे चिडीचूप. नुसत्याच माना हलवतात. ‘आरं, लै राबलूया. पर क्रेडिट आमाला न्हाईच! काय रे सागर, बोल की..’ सागर परत मान हलवतो.

तेवढ्यात एकजण मोबाईल सदाभाऊंपुढं धरतो. व्हॉटस्अ‍ॅपची पोस्ट दाखवतो. नवे खासदार धैर्यशील मानेंच्या फोटोमागं सदाभाऊंचा हसरा फोटो असतो. खाली लिहिलेलं असतं, ‘वाळव्यात लीड नाही. शिराळ्यात लीड नाही. यांच्या मरळनाथपुरात २५८चं लीड... आणि म्हणे हे किंगमेकर!’ सदाभाऊंचा चेहरा कसानुसा होतो. घशात कडवट गुळणी येते. गार पाण्याचा घोट घेऊन ते बोलू लागतात, ‘कुणी टाकलं म्हणायचं? मला बदनाम करत्यात. त्या दादांच्या मानसांचं काम असणार हाय...’ (पोरांना कळेना, नेमके दादा कोण? चंद्रकांतदादा की निशिकांतदादा?)सदाभाऊ तळमळीनं बोलत होते, ‘पदरमोड करून प्रचार केलाय आमी. गाडी-घोडं, कार्यकर्त्यांचं खाणं-पिणं, स्पिकर-बिकर’ला काय पैसं लागत न्हाईत? त्येंनी काय दिलं? वरनं काय सुदीक आलं न्हाय. आमीच खिशातलं घातलं.’

‘मागच्या येळंला त्या माढ्यातबी काय मिळालं न्हाई. सगळ्यांना मुंबयमधनं खोकी आलती. पन आमी हुबा राहुनबी आमालाच काय न्हाई. का तर आमी तवा ‘स्वाभिमानी’कडनं लढत हुतो, म्हणून बीजेपीवाल्यांनी काय दिलं न्हाई. आता तर मिनिस्टर म्हणून काय न्हाई. सगळी रसद दादांच्या हातात!’... ही खरी मळमळ सदाभाऊंच्या मुखातून बाहेर पडत होती.

बाहेर गाडीचा आवाज आला. त्यातनं उतरून गणेश पळतच आला... ‘भाऊ... भाऊ, बगा काय मिळालंय... चंद्रकांतदादांची डायरी हाय. बालगावच्या मठात घावली. आणली उचलून. हिशेब हाय ह्यात इलेक्शनचा.’सदाभाऊंचा चेहरा खुलला. ‘लावा रं फोन सगळ्यांना. घ्या बोलवून. सगळ्यांना कळंल, की सदाभाऊला किती मिळालं त्ये. त्या निशिकांतदादाला, महाडिकांच्या पोरांना, नायकवडींच्या गौरवला, शिंदेंच्या वैभवला, शिराळ्याच्या नाईकसाहेबांना फोन लावा. वारणेच्या सावकरांनाबी बोलवा.’

फटाफट फोन लावले गेले. पोटात कावळे ओरडत होते. नेर्ल्याच्या दत्त भुवनमधून मागवलेल्या मटण-भाकरीवर सगळ्यांनी आडवा हात मारला. तासाभरात बोलावलेली मंडळी आली. सदाभाऊंनी सगळ्यांना कोचावर बसवलं. सरबत दिलं आणि डायरी दाखवली... ‘बघा. ही डायरी चंद्रकांतदादांची हाय. इलेक्शनचा सगळा हिशोब हाय त्यात. आमाला दादांनी काय सुदीक दिलं नव्हतं. खिशाला खार लागला आमच्या. आता वाचूयाच... कुनाला काय दिलं त्ये.’पहिलं पान उघडलं आणि थंडगार एसीतही सदाभाऊंना घाम फुटला. त्यांनी टर्रकन् पान फाडलं. डस्टबीनमध्ये टाकलं. ‘जाऊ दे मंडळी. नंतर बोलू... जेवा आता. मी जर जाऊन येतो,’ म्हणून डायरी बंद केली. ते गेले. वारणेच्या सावकरांनी हळून डस्टबीनमधनं कागद उचलला.त्यावर तारीख होती १० एप्रिल.

लिहिलं होतं, ‘आज सगळ्यांना पोहोच केलं. शेवटून पाचव्या पानावर रकमा लिहिल्या आहेत. सदाभाऊ सगळ्यांना चुना लावतात म्हणून मी त्यांना काहीच दिलं नाही. पण ‘सीएम’कडून त्यांना दोन खोकी पोहोच झाल्याचं समजलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सदाभाऊंना बंडल दिलं, पण लगेच कोल्हापुरात जाऊन त्यांनी कपडे, चप्पल आणि घरासाठी पडदे खरेदी केले होते...’सावकरांनी कागदाचा बोळा करून फेकून दिला!

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९