शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

लिंगायत धर्ममान्यतेसाठी सोमवारी धरणे-अखिल भारतीय समन्वय समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 1:23 AM

सांगली : लिंगायत धर्ममान्यतेसाठी महाराष्ट्राच्या पुढे जाऊन कर्नाटक सरकारने ठराव करून केंद्र शासनाकडे शिफारस केली. मात्र महाराष्ट्र शासन यात वेळकाढूपणा करीत आहे

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना पत्रे पाठविणार

सांगली : लिंगायत धर्ममान्यतेसाठी महाराष्ट्राच्या पुढे जाऊन कर्नाटक सरकारने ठराव करून केंद्र शासनाकडे शिफारस केली. मात्र महाराष्ट्र शासन यात वेळकाढूपणा करीत आहे. शासनाला जाग आणण्यासाठी सोमवार, दि. २६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे सदस्य विश्वनाथ मिरजकर, प्रदीप वाले यांनी बुधवारी दिला.

मुख्यमंत्र्यांना समाजातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या नावांसह मागणीची पत्रे पाठविण्याचे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.मिरजकर म्हणाले, लिंगायत स्वतंत्र धर्ममान्यता, अल्पसंख्याक दर्जा व पोटजातींना आरक्षणासाठी देशभर लढा सुरू आहे. याअंतर्गत महाराष्ट्रात आघाडी आहे; मात्र कर्नाटक सरकारने नागमोहन दास समितीद्वारे स्वतंत्र धर्ममान्यतेची शिफारसही केली. परंतु महाराष्ट्र समितीने याबाबत अद्याप निर्णय घेण्यास विलंब लावत आहे. य्राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याबाबत चर्चा झाली. तावडे यांनी अपुऱ्या पुराव्यांच्याआधारे धर्ममान्यता देता येणार नाही, असे जाहीर केले. परंतु त्यांनी येत्या अधिवेशनात चर्चा घडविण्याचे आश्वासन दिले.

वाले म्हणाले, मात्र काहीजणांनी याला खोडा घालण्यासाठी वीरशैव लिंगायत असे वेगळे वळण देऊन अडचणीचा उद्योग सुरू केला आहे. याचा आम्ही निषेध करीत आहोत. राज्य शासनाने धर्ममान्यता, अल्पसंख्याक दर्जाबाबत केंद्र शासनाला शिफारस करावी. अन्यथा देशातील ७ कोटी बांधवांना सरकारविरोधात वेगळा विचार करावा लागेल. यावेळी राजेंद कुंभार, विजयराव धुळूबुळू, अशोक कोष्टी, उद्योजक डी. के. चौगुले, संजीव पट्टणशेट्टी, संजय ठिगळे, सावंता येवारे, सचिन गाडवे, सुरेश गारे, शरद नकाते, शंकर रोकडे उपस्थित होते.जिल्हाधिकाºयांना निवेदनअखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने राज्य शासनाला भावना कळवाव्यात यासाठी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना निवेदन दिले. लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने म्हणाले, कर्नाटक असो वा महाराष्ट्र, कागदोपत्री पुराव्याच्याआधारे स्वतंत्र धर्म असल्याचे निष्कर्ष पुढे आले. मग केवळ महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यावर पुराव्यांत बदल कसा होतो? वास्तविक लिंगायत महामोर्चाद्वारे समाजाच्या भावना रस्त्यावर उतरून व्यक्त होत आहेत. यामुळे राज्य शासनानेही सकारात्मक निर्णय घ्यावा. त्याद्वारे महाराष्ट्रानेही केंद्र शासनाकडे धर्ममान्यतेसाठी शिफारस करावी. अन्यथा आंदोलन वेगळी दिशा घेईल.