मिरज : मिरजेतील शिवाजीनगर येथे सुमती शामसिंग सुल्यान या महिलेच्या सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या पाटल्या घरातून चोरीस गेल्या. याप्रकरणी त्यांच्याच घरात घरकाम करणाऱ्या चार महिलांविरुध्द गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हॉटेल व्यावसायिक शामसिंग सुल्यान यांचा शिवाजीनगर येथे हरिओम बंगला आहे. त्यांच्या पत्नी सुमती यांनी दोन महिन्यापूर्वी बेडरूममधील ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या ठेवल्या होत्या. त्या गायब झाल्या आहेत.सुल्यान यांच्या घरात घरकाम करणाऱ्या चार महिला असून, या महिलांनीच पाटल्या चोरल्याची तक्रार सुमती सुल्यान यांनी पोलिसात दिली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी लक्ष्मी घंटी, मीना कांबळे, मंजुळा केंपण्णावर व वंदना हिरगुडे (सर्व रा. मिरज) यांच्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करीत आहेत. या महिलांकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सोहोलीत मंदिरातील दानपेटी फोडली, दोघांना अटक : भाविकांमधून संतप्त पडसाद
कडेगाव : सोहोली (ता. कडेगाव) येथील जनाईदेवी मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील ४ ते ५ हजार रुपयांची चोरी केल्याप्रकरणी संशयित सचिन रामहरी गुरव व सागर रामहरी गुरव (दोघे रा. उपाळे मायणी, भवानी मळा) यांच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार, दि. २० मार्च रोजी रात्री घडली होती.या घटनेमुळे भाविकांमधून संतप्त पडसाद उमटत आहेत. बुधवार, दि. २० रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास या मंदिरातील दानपेटीतील सुमारे ४ ते ५ हजार रुपये संशयित सचिन गुरव व सागर गुरव यांनी चोरून नेले. याबाबतची फिर्याद नवनाथ ज्ञानू गुरव (वय ४५, रा. सोहोली, ता. कडेगाव) यांनी दिली आहे. याप्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, संशयित सचिन गुरव यास पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.